तूर चाेरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:49+5:302021-06-06T04:25:49+5:30
विशाल इंगाेले यांची विश्वकाेश मंडळावर निवड लाेणार : महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकाेष निर्मिती मंडळाची १ ...
विशाल इंगाेले यांची विश्वकाेश मंडळावर निवड
लाेणार : महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकाेष निर्मिती मंडळाची १ जूनला शासनाने नवीन कार्यकारिणीची पुढील तीन वर्षांसाठी घाेषणा केली आहे. यात लाेणार येथील प्रसिद्ध कवी डाॅ. विशाल इंगाेलेे यांची नियुक्ती केली आहे.
२० गरजू कुटुंबीयांना केला किराणा किटचे वाटप
तळणी : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या अनेक समाज घटकांना मदतीची गरज आहे. टीम परिवर्तन मुंबई व जाणीव बहुद्देशीय फाउंडेशन मलकापूर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील २० कुटुंबांना १ जून राेजी किराणा वाटप करण्यात आले. या वेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित हाेते.
निर्बंधांच्या काळात मालवाहतुकीस परवानगी
बुलडाणा : जिल्ह्याच्या मालवाहतूक व रुग्णवाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज नाही. तथापि मालवाहतूक, खतसाठा इत्यादी बाबतीत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी निर्बंधाच्या काळात राहणार आहे़
सलुन दुकाने उघडण्यास परवानगी द्या
बुलडाणा : काेरोना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे़ जवळपास सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे़ मात्र, सलुन व्यावसायिकांना परवानगी दिली नाही़ त्यामुळे सलुन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़
चांगल्या पावसाशिवाय पेरणी करू नये
बुलडाणा : खरीप हंगामास लवकरच सुरुवात हाेणार आहे़ शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात जाेरदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केली आहे. अनेक शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा न करता पेरणी करतात. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे़
वाघजाळ ते नेहरूनगर रस्त्याची दुर्दशा
माेताळा : वाघजाळ फाट्यापासून नेहरूनगर जाणाऱ्या दाेन ते अडीच किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक याेजनेतून गत एक वर्षापासून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता खाेदून ठेवलेला असल्याने वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास हाेत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देऊळगाव राजात जुगाराचे प्रमाण वाढले
देऊळगाव राजा : गत काही दिवसांपासून देऊळगाव राजा शहर व तालुक्यात गत काही दिवसांपासून जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात जुगार खेळणाऱ्यांची गर्दी हाेत असल्याने काेराेना संसर्ग हाेण्याची भीती आहे. पाेलिसांनी जुगारींवर कारवाईही केली आहे़
बसफेरी सुरू करण्याची मागणी
सुलतानपूर : गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली असून ग्रामीण भागात बसफेरी सुरू करण्याची मागणी हाेत आहे़
बँकांची वेळ वाढवण्याची मागणी
बुलडाणा : सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, सूक्ष्म वित्तीय संस्था, सहकारी संस्था, पतपेढी, विमा, पोस्ट पेमेंट बँक सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहत आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने बँकांची वेळ वाढवण्याची मागणी हाेत आहे़
जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पास आवश्यक
बुलडाणा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध कायम ठेवले आहेत. जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक आहे. वैद्यकीय किंवा इतर कारणासाठी पाेलीस विभागाच्या वेबसाइटवरून ई-पास काढावा लागणार आहे़
सिलिंडरचे घरपाेच वितरण सुरूच राहणार
बुलडाणा : गॅस एजन्सीजमार्फत घरपोच गॅस सिलिंडरचे वितरण सकाळी ७ ते सायं. ६ या वेळेत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु ग्राहकांनी गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलिंडर घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़
बुलडाणा शहरात ढगाळ वातावरण
बुलडाणा : शहरात दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. त्यामुळे नागरिकांचा कडाक्याच्या उन्हापासून बचाव झाला़ खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाले असून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे़