देऊळघाट पाठोपाठ करवंडमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालके जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:24+5:302021-02-10T04:35:24+5:30
बुलडाणा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी सैलानी येथे एका आठ ...
बुलडाणा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी सैलानी येथे एका आठ वर्षाचा मुलाचाही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर बुलडाणा शहरानजीकच्या सागवन येथेही एका बालकास कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले होते. दुसरीकडे देऊळघाट येथेही आठ फेब्रुवारी रोजी चार बालकांना पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यांच्यावरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर ९ फेब्रुवारी रोजी चिखली तालुक्यातील करवंड येथेही पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालके जखमी झाली आहेत. या घटनेत करवंड येथील निशा सागर गवई (५), शेख असद शेख अन्वर (९), पूर्वा सुनील फाटे (११), कार्तिक समाधान तारगे (६) ही बालके जखमी झाली आहेत. या चारही मुलांना तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करवंड गावातील नागरिकांनी या घटनेनंतर संतप्त होत पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले.