सात लाख लुटणा-यास चार दिवसांची कोठडी
By admin | Published: August 28, 2016 11:24 PM2016-08-28T23:24:11+5:302016-08-28T23:24:11+5:30
आरोपीकडून बनावट चलन जप्त; चोरट्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी.
सिंदखेडराजा(जि. बुलडाणा),दि. २८: तालुक्यातील साखरखेर्डा आणि किनगावराजा पोलिस स्टेशन अंतर्गत दामदुप्पट करून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणार्या आरोपीकडून पावडर आणि बनावट नोटांचे बंडल २३ ऑगस्ट रोजी जप्त करण्यात आले आहेत. यासाठी किनगावराजा आणि सा खरखेर्डा पोलिसांनी चार दिवसाची पोलिस कोठडी मिळविली. साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत गोरेगाव फाट्याजवळील दर्गा परिसरात नाशिक येथील नामदेव पायगव्हाणे यांना बोलावून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले होते. ठरल्याप्रमाणो सायंकाळी नामदेव पायगव्हाणे त्या ठिकाणी सात लाख रूपये घेवून आले. शे.शफी शे.शगीर यांनी पैशाची बॅग पायगव्हाणे यांच्याकडून घेतली. त्या बॅगमध्ये पावडर टाकून पोलिस आल्याचा बहाणा करून पैशाची बॅग घेवून पसार झाले. या घटनेनंतर तब्बल १0 महिन्यांनी पोलिस उपनिरीक्षक उमेश भोसले यांनी गुन्हा दा खल केला होता. यातील मुख्य आरोपी शे.शफी कादरी यास साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांनी चार दिवसाची पोलिस कस्टडी मिळवून हिरक भस्म पावडर आणि नकली नोटांचे बंडल काढून गुन्ह्याची कबूली दिली. दुसरी घटना किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली असून जांभोरा येथील जयाजी सुलाजी खरात यांना दामदुप्पट करून देण्याच्या नावाखाली दोन लाख रूपयांनी फसविल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जांभोरा येथील गंगाराम खरात यांनी जयाजी खरात यांची भेट घेवून साखरखेर्डा येथील एक मौलाना दाम दुप्पट करून देतो म्हणून शे.शफी कादरी यांची भेट घालून दिली. ठरल्याप्रमाणे ५ मे २0१६ रोजी शे.शफी कादरीसह ११ लोक रात्री ९ ते १0 च्या दरम्यान शे तामध्ये आले. त्यांनी दोन लाखाचे चार लाख करून देतो म्हणून जयाजी खरात यांच्याजवळून दोन लाख रूपये घेतले ते खोलीत पैसे घेवून आले. खोलीत पैसे ठेवून बाहेर जाण्याचे सांगितले. शे.शफी कादरी यांनी मंत्रतंत्राचा व पावडरचा वापर करून आपला कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर त्यांचीही फसवणूक झाली. तब्बल तिन महिन्यांनी २१ ऑगस्ट रोजी किनगावराजा पो.स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी १२ आरोपी विरूध्द भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखेडे, पोहेकाँ सुरजितसिंग इंगळे, पोकाँ गजानन सानप, पोकॉ सचिन मुदमाळी, पोकॉ जाफर पठाण हे करीत आहेत. शे.शफी शे.कादरी यांच्याविरूध्द जळगाव खांदेश एमआयडीसी पोलिस स्टेशन, सिल्लोड, मंठा, किनगावराजा, लोणार, साखरखेर्डा इ. ठिकाणी फसवणुकीचे, छेडछाडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस कोठडी नंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.