कोरोनामुळे चौघांचा मृत्यू, ५९१ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:35+5:302021-05-21T04:36:35+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १००, खामगाव ४१, शेगाव ९७, देऊळगाव राजा १३, चिखली ४८, मेहकर ४९, मलकापूर ५४, नांदुरा ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १००, खामगाव ४१, शेगाव ९७, देऊळगाव राजा १३, चिखली ४८, मेहकर ४९, मलकापूर ५४, नांदुरा ४०, लोणार ३६, मोताळा १३, जळगाव जामोद ४६, सिंदखेड राजा २४ आणि संग्रामपूर तालुक्यातील ३० जण असे ५९१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. उपचारादरम्यान मलकापूर येथील पारपेठ भागातील ५० वर्षीय महिला, शेगाव तालुक्यातील एकलारा येथील ६० वर्षीय महिला, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील ५५ वर्षीय पुरुष आणि मेहकर येथील ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
दरम्यान, बुधवारी ७५९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ३६ हजार १७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ७४ हजार ६६८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
--३,३९८ अहवालाची प्रतीक्षा--
बुधवारी ३ हजार ३९८ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८० हजार ५३५ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ३३१ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत कोरोनाबाधितांपैकी ५३६ जणांचा मृत्यू झाला आहे.