कोरोनामुळे चौघांचा मृत्यू, ७४ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:26+5:302021-06-10T04:23:26+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २१, देऊळगाव राजा २९, चिखली ५, मेहकर, मलकापूर आणि नांदुरा तालुक्यांतील प्रत्येकी एक, लोणार ...
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २१, देऊळगाव राजा २९, चिखली ५, मेहकर, मलकापूर आणि नांदुरा तालुक्यांतील प्रत्येकी एक, लोणार २, जळगाव जामोद २, संग्रामपूर ३ आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ९ जणांचा समावेश आहे. बुधवारी रुग्णालयात उपचारादरम्यान शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील ७१ वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील केळवद येथील ८० वर्षीय महिला, सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी येथील ८५ वर्षीय महिला आणि बुलडाणा शहरातील शिवशंकरनगरमधील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी १३८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख १४ हजार ४०५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच एकूण बाधितांपैकी ८४ हजार ३८० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
--१३९९ अहवालांची प्रतीक्षा--
तपासणीसाठी घेण्यात आलेल्या १ हजार ३९९ संदिग्धांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८५ हजार ७८३ झाली आहे. यापैकी ७६४ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत ६३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-- तीन तालुक्यांत एकही रुग्ण नाही--
बुधवारी खामगाव, शेगाव आणि मोताळा तालुक्यात एकही संदिग्ध कोरोना बाधित आढळून आला नाही. बुधवारी ४ हजार ७८ संदिग्धांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली होती.