पोलिसांकडून चार पत्रकारांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:25+5:302021-07-02T04:24:25+5:30
याप्रकरणी दोषी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथून ...
याप्रकरणी दोषी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथून साधारण तीन कि.मी.अंतरावर विदर्भ आणि मराठवाडा हद्द आहे. याठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या काही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. यामध्ये हजारो रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
बराच वेळ घटनास्थळी कारवाईचे निमित्ताने गोंधळ सुरू होता. याबाबत चांडोळ येथील पत्रकार गजानन मरमट, शेख मजर, शेख नदीम, दीपक जाधव यांना या कारवाईची माहिती मिळाली. ते बातमीकरिता माहिती घेण्यासाठी घटनास्थळी गेले असता मोबाइलमध्ये फोटो घेताना व माहिती पोलिसांना विचारताच घटनास्थळी हजर असलेल्या शिपाई डिगांबर कपाटे व पी.एस.आय. सागर पेंढारकर यांनी पत्रकारांशी असभ्य वर्तन करत शिवीगाळ केली. पत्रकाराचा मोबाइल फेकून दिला. यासंदर्भात ठाणेदार दिनेश झांबरे यांना निवेदन देऊन उपरोक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकार संघाच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पत्रकारांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. विजय जट्टे, रामदास सनांन्से, मो.मुस्ताक, बबन फेपाळे, मो.जाकीर, शेख.नदीम, योगेश उबाळे, गजानन मरमट, प्रमोद गायकवाड, शेख मजर, दीपक जाधव, सागर जयस्वाल, सुरेश सोनुने, गणेश भालके, संजय देशमुख, गणेश अंभोरे, असिम बेग मिर्झा यांची उपस्थिती होती.