भोसा येथे आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:34+5:302021-06-04T04:26:34+5:30
३० पैकी १३ जणांची विलगीकरण कक्ष मेहकर येथे रवानगी करण्यात आली आहे. तर एकाला बुलडाणा येथील कोविड सेेंटरमध्ये भरती ...
३० पैकी १३ जणांची विलगीकरण कक्ष मेहकर येथे रवानगी करण्यात आली आहे. तर एकाला बुलडाणा येथील कोविड सेेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. भोसा येथे नुकतीच ५८ जणांची कोरोना आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी चार जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर अधिकच ताण वाढला असून भोसा येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोसा डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून या केंद्रांतर्गत २७ गावांचा समावेश आहे. तर सहा उपकेंद्रांतर्गत सहा आरोग्य सेवक आहेत. आरोग्य विभागाच्या अनेक जागा रिक्त असल्याने डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण वाढला आहे. अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांअभावी दहा-दहा तास कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदिवासी बहुल गावांचा समावेश असलेल्या या डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी हाेत आहे.
चारही रुग्णांची मेहकर येथे रवानगी
२ जून रोजी भोसा गावातील चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे विलगीकरण कक्ष मेहकरमध्ये पाठविण्यात आले. या वेळी बीट जमादार म्हस्के, शिक्षक तोडे, पोलीस पाटील उत्तम मोघाड, उपसरपंच राजू भोडणे, भोसा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पी.के. गवई व अंगणवाडी सेविका शारदा डाखोरे, मदतनीस सुनीता भोडणे, आशा सेविका मोघाड, जाधव हजर होत्या.