बुलडाणा जिल्ह्यात चार टक्के पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 05:31 PM2019-06-07T17:31:26+5:302019-06-07T17:31:37+5:30

बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का तब्बल १२ दिवसांनी एक टक्का वाढला असून आतापर्यंत चार टक्के शेतकºयांना ६६ काटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Four percent crop distribution in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात चार टक्के पीककर्जाचे वाटप

बुलडाणा जिल्ह्यात चार टक्के पीककर्जाचे वाटप

Next

बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का तब्बल १२ दिवसांनी एक टक्का वाढला असून आतापर्यंत चार टक्के शेतकºयांना ६६ काटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २५ मे रोजी चार हजार १८२ शेतकºयांना ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील आठ हजार ७४७ शेतकºयांना ६६ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले असून त्याची टक्केवारी ही चार टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यात यंदा तीन लाख ३४ हजार शेतकºयांना एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. पीक कर्ज वाटपास प्रारंभ होऊन दीड महिन्याचा कालावदी जवळपास लोटला आहे. मात्र वाटपाचा टक्का अपेक्षेप्रमाणे सुधारलेला नाही. दर १५ दिवसांनी पीक कर्ज वाटपाचा आढावा यंत्रणा घेत आहे. त्यातून उपलब्ध झालेल्या  आकडेवारीचा विचार करता पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने कमी आहे. गत वर्षी ३४.१५ टक्के पीक कर्ज वाटप संपूर्ण हंगामात झाले होते. ही बाब पाहता यंदा हा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली करण्यात येत आहे. त्यासाठी पीक कर्ज मेळावे मंडळ निहाय घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र अपेक्षीत असा प्रतिसाद अद्याप त्यास मिळालेला नाही.
मान्सून सध्या तोंडावर आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यात अद्याप एकदाही मान्सूनपूर्व पाऊस पडलेला नाही. येत्या काळात तो सक्रीय होईल. त्यामुळे शेतकºयांनीही शेती मशागतीची लगबक करून ती पूर्णत्वास नेली आहे. पावसाचे आगमन होताच शेतकरी पेरते होतील. मात्र त्यासाठी बी-बियाणे खरेदीसाठी वर्तमान स्थितीत शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध झाल्यास त्यांचा पुढील काळाताली भार हलका होण्यास मदत होणार आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने अत्यंत कमी आहे.
दुष्काळी स्थिती पाहता शेतकºयांच्या हातात आता किमान पैसा असणे येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक झाले आहे. मात्र बँकांच्यास्तरावर त्यादृष्टीने अपेक्षीत कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेचे ३७ टक्के वाटप
पीक कर्ज वाटपाचा विचार करता जिल्हा  केंद्रीय सहकारी बँकेने आतापर्यंत एकूण उदिष्टाच्या ३७ टक्के वाटप केले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट असून त्यापैकी १७ कोटी ४४ लाख रुपयांचे त्यांनी एक हजार ७४४ शेतकºयांना वाटप केले आहे. राष्टीयकृत, व्यापारी आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा विचार करता सर्वाधिक पीक कर्ज हे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने आतापर्यंत वाटप केले आहे.

 

Web Title: Four percent crop distribution in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.