कारमधून दारू वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक
By admin | Published: May 22, 2017 12:38 AM2017-05-22T00:38:06+5:302017-05-22T00:38:06+5:30
नांदुरा : अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील चौघांना नांदुरा पोलिसांनी पकडून, ३ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील चौघांना पकडून त्यांच्या ताब्यातून ६७ हजार रुपयांची विदेशी दारूचा साठा व कार असा, ३ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई २० मे रोजी संध्याकाळी करण्यात आली.
नांदुरा पोलिसांना प्राप्त माहितीनुसार, २० मे रोजी संध्याकाळचे सुमारास राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला असताना पोलिसांना संशयित कार क्रमांक एम एच ३० एएफ २५१ ची झडती घेतली असता, पोलिसांना या कारमधून विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी कारमधील विदेशी दारूचे सात बॉक्स ६७ हजार २०० रुपये व कार, असा एकूण ३ लाख ४७ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी गणेशसिंग श्रीरामसिंग जाधव (वय ३६), देवेंद्र वसंतराव ठाकरे (वय ३०), अमित कृष्णराव ठाकरे (वय २७) व पवन ओंकारराव म्हस्के (वय २६) रा.धनज बु. जिल्हा वाशिम अशा चौघांना नांदुरा पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.