पुरात अडकलेल्या चौघांना वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 02:10 PM2019-06-29T14:10:42+5:302019-06-29T14:11:08+5:30
ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहल्याची घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी सोल फेकून ट्रॅक्टरवरील चारही जणांचे जीव वाचवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पैनगंगा नदीला आलेल्या चौथ्या पुरादरम्यान देऊळघाट येथे ट्रॅक्टरद्वारे नदी ओलांडताना ट्रॅक्टरच पुराच्या पाण्यात वाहले. त्यामुळे त्यातील चार जणांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. सुदैवाने लगतच्या नागरिकांनी सोल फेकून चौघांचे प्राण वाचविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला
शुक्रवारी दुपारी देऊळघाट येथे ही घटना घडली. २९ जून रोजी पैनगंगा नदीला गेल्या पाच दिवसातील चौथा पुर आला. दुपारी पैनगंगेच्या उगमक्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे पैनगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे. दुपारी पडलेला हा पाऊस संततधार होता. त्यामुळे नदीला पुन्हा एकदा मोठा पुर आला. या दरम्यान दुपारी देऊळघाट येथे विजय जगन्नाथ जादव हे त्यांचे ट्रॅक्टरद्वारे नदी ओलांडून घराकडे येत होते. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठा होता. त्यातच ट्रॅक्टर हे पुराच्या पाण्यातच बंद पडल्याने वाहले. या ट्रॅक्टरवर चार माणसे होती. त्यात एक पुरुष एक स्त्री व दोन मुलांचा समावेश होता. मात्र ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहल्याची घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी सोल फेकून ट्रॅक्टरवरील चारही जणांचे जीव वाचवले. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही.
नदीच्या पुरात ४ जण सुदैवाने बचावले
जळगाव जामोद : तालुक्यामध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे मोहीदे पूर जवळून वाहणा?्या नाव नदीला आज संध्याकाळच्या दरम्यान आलेल्या पुरामध्ये एका बैलगाडी सह 4 जण वाहून जात असताना सुदैवाने ते तिघेजण बचावले मात्र बैलगाडी वाहून गेली ही घटना आज २८ जून रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. याबाबत माहिती अशी की मोहिदे पूर येथील एकाच कुटुंबातील सखाराम गोविंदा सनिसे बाबर यांच्यासह पवन सखाराम सनीसेबाबर ,निर्मला सखाराम सनिसेबाबर आणि सचिन सोळुंके हे शेतामध्ये कामगिरीसाठी गेले होते आणि संध्याकाळी बैलगाडीने शेतामधून घराकडे येत असताना नदीला अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बैलगाडी पाण्यात वाहून गेली मात्र सुदैवाने या तिघांची मृत्यूच्या दाढेतुन सुटका झाली परंतु सदर घटनेमध्ये संबंधित शेतक?्याचा बैल जोडी वाहून गेली त्यापैकी एक बैल काठाला लागला तर दुसरा बैल वाहून गेल्याची माहिती आहे यासंदर्भात गावक?्यांनी यातील शेतक?्यांना मदतीचा हात दिला व मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले बैलगाडी वाहून जाताना पाहताच गावक?्यांनी धावाधाव केली आणि या चौघांचे प्राण वाचविले.(प्रतिनिधी)