समृद्धीसाठी चारपटच मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 04:14 AM2018-07-25T04:14:35+5:302018-07-25T04:15:05+5:30
आता वन जमीन, ई-क्लास जमीन वगळता इतर जमीन ही महाराष्ट्र महामार्ग अधिनियमानुसार आता खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- नीलेश जोशी
बुलडाणा : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या आणि दहा जिल्ह्यांतून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ७ हेक्टर जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, आता वन जमीन, ई-क्लास जमीन वगळता इतर जमीन ही महाराष्ट्र महामार्ग अधिनियमानुसार आता खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भ, मराठवाड्याला थेट मुंबईशी कमी वेळात जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा आहे. या मार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार २१८.६२ हेक्टर जमीन खरेदी करावयाची आहे. जिल्ह्यातील ३० गावांमधून ८७.३० किमी लांबीचा हा महामार्ग जात आहे. आतापर्यंत या महामार्गासाठी जिल्ह्यात १००७.२७ हेक्टर जमीन म्हणजे ८९ टक्के जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यापोटी ६३५ कोटी रुपये संबंधितांना देण्यात आले आहे. दरम्यान, उद्दिष्टाच्या तुलनेत अद्यापही २११.३५ हेक्टर जमीन खरेदी करणे बाकी आहे; मात्र यात ८१.७९ हेक्टर जमीन ही वन जमीन, ई-क्लास जमीन आणि खात्यांची जमीन आहे.
> संमती न दिल्यास जनरल अवॉर्ड
सबंंधितांना अधिनियमाच्या कलम १८ अंतर्गत चारपटच मोबदला मिळणार आहे. संमती घेऊन जमीन देणाºयांना जमिनीच्या बाजार मूल्याच्या पाचपट रक्कम दिली जाणार आहे, तर संमती न देणाºयांंची जमीन जनरल अवॉर्डद्वारे शासन ताब्यात घेईल. अशांना केवळ चारपटच मोबदला मिळेल, अशी माहिती समृद्धी महामार्गाचे काम पाहणारे अधिकारी दिनेश गीते यांनी दिली.