चार ट्रक रेती पकडली; एक लाखाचा दंड वसूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:53 AM2017-08-15T00:53:54+5:302017-08-15T00:55:22+5:30
चिखली : चिखली परिसरात अवैध रेती वाहतूक करीत असताना चार ट्रक तहसील कार्यालयातील अधिकार्यांनी रविवारी पकडले असून, त्यांना एकूण १ लाख ७ हजार ८00 रुपये दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चिखली परिसरात अवैध रेती वाहतूक करीत असताना चार ट्रक तहसील कार्यालयातील अधिकार्यांनी रविवारी पकडले असून, त्यांना एकूण १ लाख ७ हजार ८00 रुपये दंड ठोठावला आहे.
चिखली शहरात अवैध मार्गाने मोठय़ा प्रमाणात रेती वाह तूक होत असून, त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे. येथील नायब तहसीलदार कृणाल झाल्टे, मंडळ अधिकारी पी.पी.वानखेडे व तलाठी यांनी सुटीच्या दिवशी तपासणी करून गजानन रामदास अवसरमोल चांधई हे वाहन क्र. एम.एच.२0 एफ ५९४९ मधून १ बरास रेतीची वाहतूक करीत असताना पकडले व त्याला १५ हजार ४00 रुपये, विलास थुट्टे भरोसा हा गाडी क्र. एम.एच.२८ एबी ७८४४ मधून २ बरास रेतीची वाहतूक करीत असताना पकडले. त्याला ३0 हजार ८00 रुपये, शिवाजी रंगनाथ होईफोडे सुलतानपूर यास वाहन क्र. एम.एच.२८ आर ७४४४ मधून दोन बरास रेतीची वाह तूक करीत असताना पकडले व त्यांना ३0 हजार ८00 रुपये, दादाराव चेडोळ जांभोरा यास वाहन क्र. एम.एच.२८ बी ८२२८ मधून २ बरास रेतीची वाहतूक करीत असताना पकडले व त्याला ३0 हजार ८00 रुपये. दंड ठोठावला, असे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) नुसार तहसीलदार मनिष गायकवाड यांनी चारही लोकांना एकूण १ लाख ७ हजार ८00 रुपये दंड ठोठवला आहे.