बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ११४० जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:15 AM2021-04-17T11:15:06+5:302021-04-17T11:15:13+5:30
Corona Cases in Buldhana : ११४० जण कोरोना बाधित आढळून आले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ११४० जण कोरोना बाधित आढळून आले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ७,८९४ संदिग्धांच्या अहवालापैकी ६,७५४ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले.
एकट्या बुलडाणा तालुक्यात २१६, खामगाव तालुक्यात १२४, शेगावमध्ये ४२, देऊळगाव राजामध्ये ९०, चिखलीमध्ये ७७, मेहकरमध्ये १५४, मलकापूरमध्ये १३२, नांदुऱ्यात ५२, लोणारमध्ये ३३, मोताळ्यात ११३, जळगाव जामोदमध्ये ३, सिंदखेडराजा तालुक्यात ८१ आणि संग्रामपूर तालुक्यात २३ जण या प्रमाणे ११४० जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान, मेहकर तालुक्यातील विश्वी येथील ६० वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील ६५ वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७९ वर्षीय महिला आणि खामगावातील जोशीनगर मधील ८० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे १६ एप्रिल रोजी ७८० जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी २ लाख ९० हजार ५०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आजपर्यंत ४३ हजार ६९३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.