अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:27 PM2019-05-04T15:27:19+5:302019-05-04T15:27:25+5:30
बुलडाणा: अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिची छेडखानी करणाºयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ मे रोजी ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिची छेडखानी करणाºयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ मे रोजी ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपी रमेश वाघ हा पिडीतीच्या घरासमोरुन चकरा मारायचा. तिला नेहमी खाणाखुना करायचा. दुचाकीवरुन तिचा पाठलाग करायचा. दरम्यान, २४ आॅगस्ट २०१७ रोजी आरोपीने पिडीतेला बळजबरीने दुचाकीवरुन मलकापूर येथे नेले. तेथे उमेश इंगळे व माधुरी इंगळे यांच्या मदतीने इंदूरला जाऊ, असे सांगितले; मात्र शहर पोलीस शोधात असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्यामुळे त्याने पिडीतेला बुलडाणा येथे आणून सोडले.
पिडीतेने सर्व घटना आई वडिलांना सांगितली. त्यामुळे त्यांनी रमेश अशोक वाघ, उमेश ताराचंद इंगळे व माधुरी उमेश इंगळे यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली.
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाने आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीता, तिची आई व मामा यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा सरकारी वकिल अॅड. वसंत भटकर यांनी आरोपीविरुध्द प्रबळ युक्तिवाद केला. सर्व पुरावे व साक्ष विशेष न्यायालयासमोर मांडून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीशांनी आरोपी उमेश वाघ यास ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम १२ नुसार १ वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर उमेश इंगळे व माधुरी इंगळे यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव कवास यांनी केला. कोर्ट पैरवी किशोर कांबळे यांनी सहकार्य केले.
(प्रतिनिधी)