२ लाखाची कापूस खरेदी करुन केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:34 AM2017-07-19T00:34:06+5:302017-07-19T00:34:06+5:30
शेगाव : व्यापारी असल्याचे भासवून शेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांकडील कापूस मोजून घेऊन त्यांना १ लाख ९० हजार रुपयांचे न वटणारे धनादेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : व्यापारी असल्याचे भासवून शेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांकडील कापूस मोजून घेऊन त्यांना १ लाख ९० हजार रुपयांचे न वटणारे धनादेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. मनसगाव येथील विजय श्रीकृष्ण कंकाळ व पांडुरंग राजाराम मनस्कार या शेतकऱ्यांना जळगाव जामोद येथील अ. सादीक देशमुख याने आपण कापसाचे व्यापारी असल्याचे भासवून त्यांच्या कडून ३३ क्विंटल ४३ किलो कापूस मोजून घेतला आणि त्याबदल्यात एकाला ८० हजाराचा तर दुसऱ्या शेतकऱ्याला १ लाख १० हजार ५८० रुपयांचे न वटणारे धनादेश दिले जे बँकेत अनादरित झाले. यानंतर पैसे देण्यासाठी उडवा उडवीची उत्तरे दिली. या प्रकरणाची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.