मालमत्तेचे बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक, महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरूध्द गुन्हा, दोघांना अटक

By अनिल गवई | Published: March 18, 2023 05:12 PM2023-03-18T17:12:35+5:302023-03-18T17:13:19+5:30

Buldhana News: पतीच्या पश्चात फिर्यादी महिलेच्या नावावर असेलेली मालमत्ता हेतुपुरस्परपणे व कपटीपणाने स्वत:च्या लाभाकरीता खोट्या सह्या आणि बनावट दस्तवेज तयार करून परस्पर हडपली.

Fraud by creating fake property documents, case against four on woman's complaint, two arrested | मालमत्तेचे बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक, महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरूध्द गुन्हा, दोघांना अटक

मालमत्तेचे बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक, महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरूध्द गुन्हा, दोघांना अटक

googlenewsNext

- अनिल गवई
खामगाव - पतीच्या पश्चात फिर्यादी महिलेच्या नावावर असेलेली मालमत्ता हेतुपुरस्परपणे व कपटीपणाने स्वत:च्या लाभाकरीता खोट्या सह्या आणि बनावट दस्तवेज तयार करून परस्पर हडपली. हा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर डॉ. शुभांगी विशाल घुले यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी चौघांिवरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील रहिवासी डॉ. शुभांगी िवशाल घुले यांनी १७ मार्च रोजी शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्या पतीच्या पश्चात फिर्यादीच्या पतीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा हेतुपुरस्सर व कपटीपणाने स्वतःताच्या फायद्याकरीता खोट्या सह्या करून बनावट दस्तऐवज अनुक्रमे पंकज वामनराव घुले (४९) रा. शुक्ला लेआउट, सौ. वंदना दत्तात्रय मुंढे रा. हिवरा, (५२) ता.जि. उस्मानाबाद, गणेश विलास महल्ले (३२) रा. गजानन कॉलनी घाटपुरी व  भट्टड अशा चौघांनी १० जानेवारी २२ ते २७ जानेवारी २३ दरम्यान तयार केले. या बनावट दस्ताच्या आधारे तहसील कार्यालय, सब- रजिस्टर कार्यालय व दिवाणी न्यायालयात वापर करण्यात आला. त्याद्वारे पतीची मालमत्ता करून फिर्यादीची फसवणुक केली. डॉ. शुभांगी घुले यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पंकज घुले सह चौघांविरुध्द भादवि कलम ४२०, ४०६, ४६७, ४७१, १२0 (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास शहर पोस्टेचे ठाणेदार | शांतीकुमार पाटील करीत आहेत.
चौकट...

खोटे मृत्यूपत्र आणले अस्ित्वात
शुंभागी घुले यांच्या पतीच्या मालकीची कोट्यवधी रूपयांची मालमत्ता हडपण्यासाठी आरोपींनी संगनमत करून खोटे मृत्यूपत्र अस्ितत्वात आणले. या मृत्यू पत्राची पडताळणी नागपूर येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकउे करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.

दोन आरोपी अटकेत
गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीसांनी कोणताही विलंब न लावता पंकज वामनराव घुले व गणेश विलास महल्ले या दोघांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी पॐरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Fraud by creating fake property documents, case against four on woman's complaint, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.