एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून फसवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:04 PM2020-11-29T12:04:16+5:302020-11-29T12:04:32+5:30
Cyber crime News एटीएम कार्डची हुबेहूब नक्कल तयार दाेघांच्या खात्यातून परस्पर ३० हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : एटीएम कार्डची हुबेहूब नक्कल तयार दाेघांच्या खात्यातून परस्पर ३० हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धाड पाेलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धाड येथील आशा साहेबराव सरोदे यांच्या खात्यातील १० हजार तर तर मौढांळा येथील माजी सैनिक तान्हाजी दगडु खरात यांच्या खात्यातून २० हजार रुपये काढण्यात आले आहेत. दाेन्ही ग्राहकांच्या खात्यातून बाशी जि.साेलापूर येथून पैसे काढण्यात आल्याचे समाेर आले. आशा साहेबराव सरोदे रा.धाड यांचे स्थानिक एस.बि.आय.मध्ये जनधन खाते आहे. नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचे मोबाईलमध्ये 10 हजार रुपये काढल्या गेल्याचा मेसेज मिळाला. तसेच ग्राम मौढांळा येथील माजी सैनिक तान्हाजी दगडु खरात यांच्या खात्यातील २० हजार रुपये काढल्या गेल्याचा मेसेज मिळाला. या घटनेनंतर दोन्ही ग्राहकांनी आपली तक्रार एस.बी.आय. शाखाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच दाेन्ही ग्राहकांनी धाड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. दाेन्ही ग्राहकांनी तातडीने सदर बँकेच्या शाखेत जाऊन पडताळणी केली असता शाखाधिकाऱ्यानी त्यांच्या खात्यातील रक्कम ही बार्शी जि. सोलापूर येथील एटीएम केंद्रातुन काढण्यात आल्याची माहीती दिली. या प्रकरणी धाड पाेलिसांनी तक्रारकर्त्या ग्राहकांना पैशांबाबत चौकशी करून रक्कम परत करण्याविषयी बॅंक व्यवस्थापकास पत्र दिले आहे. त्यामुळे बॅंक व्यवस्थापन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
मुळात कोणत्याही एटीएम मधून आता पैसे काढताना ओ.टी.पी.मागीतल्या जातो. तो संबधित ग्राहकांच्या मोबाईलवर येतो. या दोन्ही ग्राहकांना ओटीपी आला नाही. परीणामी संबधित बँकेच्या प्रशासनाने उपरोक्त ग्राहकांच्या पैशाबाबत छडा लावावा.
-दिनेश झांबरे, ठाणेदार धाड पो.ठाणे.