बनावट नोकरीपत्र देऊन फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:02 AM2017-10-12T01:02:04+5:302017-10-12T01:03:11+5:30

खामगाव : येथील हनुमान नगरातील दोघांना बनावट नोकरीपत्र  देऊन फसवणूक करणार्‍या एका आरोपीस खामगाव पोलिसांनी  अटक केली आहे. दरम्यान, यातील एक आरोपी अद्यापही  फरार आहे.

Fraud by giving fake employment! | बनावट नोकरीपत्र देऊन फसवणूक!

बनावट नोकरीपत्र देऊन फसवणूक!

Next
ठळक मुद्देआरोपीस खामगाव पोलिसांनी केली अटक एक आरोपी अद्याप फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील हनुमान नगरातील दोघांना बनावट नोकरीपत्र  देऊन फसवणूक करणार्‍या एका आरोपीस खामगाव पोलिसांनी  अटक केली आहे. दरम्यान, यातील एक आरोपी अद्यापही  फरार आहे.  प्रवीण विनायक भारंबे यांना युनियन बँक बुलडाणा येथे  खोटे नियुक्तीपत्र देऊन तर प्रशांत विनायक भारंबे यांना समाज  कल्याण विभाग मुंबई येथे नियुक्तीपत्र देत, दोन खोटे चेक देऊन  चार लाखाची फसवणूक केली. या तक्रारीवरून  गजानन विठ्ठल  इंगोले आणि प्रशांत दिनकरराव जंजाळ यांच्यावर ४२0, ३४  गुन्हा २५ ऑगस्ट रोजी दाखल केला. 

 

Web Title: Fraud by giving fake employment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.