चिखली येथे बनावट अकृषक आदेशप्रकरणी अटकसत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:52 AM2017-11-16T01:52:45+5:302017-11-16T01:53:47+5:30

चिखली : बनावट अकृषक आदेशप्रकरणी चिखली न.प.कनिष्ठ अभियंता रवि पारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली भाग १ चे तत्कालीन तलाठी शे.रियाज शे.अहेमद यांना १४ नोव्हेंबर रोजी चिखली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

Fraud scam at Chakli, riyaz shekh arrest | चिखली येथे बनावट अकृषक आदेशप्रकरणी अटकसत्र सुरू

चिखली येथे बनावट अकृषक आदेशप्रकरणी अटकसत्र सुरू

Next
ठळक मुद्देतलाठी रियाज शेख यांना पुन्हा अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : बनावट अकृषक आदेशप्रकरणी चिखली न.प.कनिष्ठ अभियंता रवि पारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली भाग १ चे तत्कालीन तलाठी शे.रियाज शे.अहेमद यांना १४ नोव्हेंबर रोजी चिखली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. या घटनेमुळे बनावट अकृषक आदेश प्रकरणाशी संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
न.प.कनिष्ठ अभियंता रवि महादेव पारसकर यांनी २२ फेब्रुवारी २0१७ रोजी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आशिष शरदचंद्रआप्पा बोंद्रे व विश्‍वजित र्जनाधनआप्पा बोंद्रे यांनी त्यांच्या मालकीचे चिखली येथील सर्व्हे न.१0६ मधील एकूण ७ प्लॉट चिखली नगर परिषदेला १३ लाख ९६ हजार ८00 रूपयांत विकण्याचा सौदा २३ मार्च २0१६ रोजी दस्त क्रमांक १९८५ नुसार नोंदणीकृत खरेदीखत करून दिलेला आहे. सदरहू खरेदीखत नोंदवितेवेळी न.प.चिखलीने खरेदीखतासाठी ६९ हजार ९00 रूपयांचे नोंदणी शुल्क भरले होते. त्यानंतर संजय बोंद्रे यांनी न.प.कडे तक्रार देऊन सदरच्या खरेदी व्यवहारात न.प.चिखलीची फसवणूक झाल्याचे नमूद केल्याने सौदय़ाची रक्कम आरोपीला अदा करण्यात आली  नाही. त्यानंतर न.प.खरेदी व्यवहारात आरोपीतांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, ते खोटे व बनावट असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणात आशिष बोंद्रे, विश्‍वजित बोंद्रे यांनी संगणमत करून खोटे व बनावट अकृषक आदेश, फेरफार, सात-बारा उतारे तयार करून पालिकेची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्याने चिखली पोलिसांनी अप.क्र.८४/२0१७ कलम ४२0, ४६८, ४७१, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हय़ाच्या तपासात आरोपी चिखली भाग १ चे तत्कालीन तलाठी शे.रियाज शे.अहेमद यांनी उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या नावाने सर्व्हे न.१0६ मध्ये बनावट अकृषक आदेश क्रमांक रे.के.क्र./एन.ए.पी.३४/ चिखली/३८/२0१0-२0११ ६/७/२0११ तसेच फेरफार व सात-बारा खोटा तयार करून शासनाची फसवणूक करण्यासह कायद्याची कोणतीही धास्ती न बाळगता उपविभागीय अधिकारी कार्यालयासारखे वरिष्ठ कार्यालयाचे बनावटी आदेश तयार करून थेट शासकीय यंत्रणेची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्हय़ात आरोपी शे.रियाज शे.अहेमद (वय ४२) यास १४ नोव्हेंबरला अटक करण्यात आली असून, १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड ठोठावण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रल्हाद मदन व पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद तांबेकर करीत आहेत. 

Web Title: Fraud scam at Chakli, riyaz shekh arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.