फेसबूकवर मैत्री, गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंटी फसवणूक; दोन नायजेरियन नागरिकांना दिल्लीतून अटक

By निलेश जोशी | Published: October 3, 2023 06:17 PM2023-10-03T18:17:54+5:302023-10-03T18:18:17+5:30

ऑगस्ट महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता.

frauds on the pretext of friendship, gifts on Facebook; Two Nigerian nationals arrested from Delhi | फेसबूकवर मैत्री, गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंटी फसवणूक; दोन नायजेरियन नागरिकांना दिल्लीतून अटक

फेसबूकवर मैत्री, गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंटी फसवणूक; दोन नायजेरियन नागरिकांना दिल्लीतून अटक

googlenewsNext

बुलढाणा : फेसबुकवर मैत्री करत गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एका पॅथॉलॉजी चालकास ६२ लाख ६७ हजार ७०० रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणा बुलढाणा सायबर पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथून दोन नायजेरियन व्यक्तींना अटक केली आहे. अद्याप या दोघांची नावे पोलिसांनी उघड केलेली नाही. त्यामुळे ही मोठी टोळी सक्रीय असण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता.

मेहकर शहरातील गजानननगरमध्ये राहणारे दीपक शिवराम जैताळकर (५०) यांची ही फसवणूक झाली होती. मेहकरमधील डीपी रोडवर त्यांची पॅथॉलॉजी आहे. २३ जून २०२३ रोजी जैताळकर यांना मारिया जोन्स यांची फेसबुकवर एक फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. ती जैताळकर यांनी स्वीकारली. संबंधित महिलेने आपण फार्मासिस्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे समव्यावसायिक असल्याने त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. ११ जुलैपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. दरम्यान, त्यानंतर संबंधित महिलेने आपले प्रमोशन झाले असून त्यामुळे आनंदी आहोत. त्या अनुषंगाने एक गिफ्ट पाठवायचे असल्याने जैताळकर यांना त्यांच्या घराचा पत्ता संबंधित महिलेने मागितला. जैताळकर यांनी त्यांच्या पॅथॉलॉजी लॅबचा पत्ता दिला होता.

दरम्यान, १३ जुलै रोजी जैताळकर यांना त्यांचे पार्सल दिल्ली एअरपोर्टवर आल्याचे समजले. सोबतच ३५ हजार रुपये कस्टम क्लिअरसाठी द्यावे लागणार, असे सांगण्यात आले. सोबतच पार्सलमध्ये ६५ हजार (जीबीपी) ग्रेट ब्रिटन पाऊंड असल्याचे सांगण्यात आले. त्यापोटी वेळोवेळी जैताळकर यांच्याकडून ॲन्डी मनी लॉन्डरिंग सर्टीफिकेट, सर्व्हीस चार्जेस, ज्युडिशियल ॲप्रुवल, एटीएम मास्टर कार्डच्या नावाखाली अज्ञात व्यक्तींनी तब्बल ६२ लाख ६९ हजार ७०० रुपये अज्ञाताने उकळल्याचे जैताळकर यांच्या लक्षात आले. १३ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान त्यांच्याकडून ठरावीक कालावधीनंतर रकमा उकळण्यात आल्या होत्या.

या प्रकरणात जैताळकर यांनी वकील मित्रास माहिती दिली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी या प्रकरणात बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

या प्रकरणात बुलढाणा सायबर सेलने तांत्रिक तपास करत दिल्ली गाठली. तेथून दोन नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेत बुलढाण्यात आणले आहे. कायदेशीर बाबीचे अन्य सोपस्कार सध्या बुलढाणा सायबर सेल पुर्ण करत आहेत.
 

Web Title: frauds on the pretext of friendship, gifts on Facebook; Two Nigerian nationals arrested from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.