मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:50+5:302021-04-30T04:43:50+5:30
कोरोनाचा वाढलेला कहर पाहता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्व स्तरावर कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी माजी ...
कोरोनाचा वाढलेला कहर पाहता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्व स्तरावर कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी माजी सरपंच शेषराव सावळे, पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर व मधुकर महाले यांनी आरोग्य सभापती कमलताई बुधवत यांना असलेल्या औषधी साठा व लसीकरणाच्या तुटवड्याबाबत मागणी केली. त्यानंतर लगेचच कमलताई बुधवत यांनी संबंधित विभागाला पत्र देऊन औषध साठा उपलब्ध करून दिला. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने घरोघरी जाऊन मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करून नागरिकांनी त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. प्रशासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी व तसे न केल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने १०० रुपये दंड आकारणी सुद्धा करण्यात येईल, असेही सुचविण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत लसीकरण शिबिर, जनजागृती व आता मास्क, सॅनिटायझरचे वाटप करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृतीही करण्यात आली आहे. यावेळी माजी सरपंच शेषराव सावळे, मधुकर महाले, नंदकिशोर देशमुख, किरण ऊगले, सुभाष पवार, गंगाधर निकम, किरण देशमुख, मधुकर सिनकर व अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.