#खामगाव कृषी महोत्सवात शेतकर्यांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:58 AM2018-02-20T01:58:08+5:302018-02-20T01:58:17+5:30
खामगाव: खामगाव येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात कृषी व्यावसायिक कं पनी सिजेंटाकडून शेतकर्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या आरोग्य शिबिराचा अनेक शेतकर्यांनी लाभ घेतला. सिजेंटाकडून शेतकर्यांसाठी मोबाइल हेल्थ व्हॅन आणि िपकांविषयी माहिती देणारी देणारा अँप तयार करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात कृषी व्यावसायिक कं पनी सिजेंटाकडून शेतकर्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या आरोग्य शिबिराचा अनेक शेतकर्यांनी लाभ घेतला. सिजेंटाकडून शेतकर्यांसाठी मोबाइल हेल्थ व्हॅन आणि िपकांविषयी माहिती देणारी देणारा अँप तयार करण्यात आला आहे. या अँपमुळे शेतकर्यांना वेळेवर शेतीची माहिती मिळते. त्यामध्ये योग्य वाण निवडणे आणि खत किंवा पीक संरक्षणाची योग्य मात्रा मोजणे, पीक संरक्षण उपायांसाठी आदर्श काळ ठरविणे आणि प्रारंभिक टप्प्यामध्ये वनस्पतींच्या ताणतणावांचे घटक ओळखणे या महत्त्वाच्या आणि उगवत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी अर्थपूर्णतेने योगदान देण्याची वचनबद्धता लक्षात घेता, सिजेंटा यांनी अँप तयार केले आहे. सिजेंटा यांनी शेतकर्यांच्या आरोग्यासाठी कृषी महो त्सवामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व रुग्णवाहिकेची सुविधा निर्माण केली.