कोरोना रुग्ण व नातेवाइकांसाठी भोजनाची मोफत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:45+5:302021-04-19T04:31:45+5:30
शहरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांवर व कुटुंबातील सदस्यांवर गंभीर संकट निर्माण होत आहे. कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातदेखील पोहोचलेला ...
शहरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांवर व कुटुंबातील सदस्यांवर गंभीर संकट निर्माण होत आहे. कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातदेखील पोहोचलेला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना औषधोपचारासाठी चिखली येथील खाजगी दवाखान्यात भरती करावे लागते. त्यामुळे रुग्णाची व परिवारातील सदस्यांची होणारी धावपळ लक्षात घेऊन येथील अशोक अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन रुग्णांसाठी व त्याच्यासोबतच्या एका व्यक्तीसाठी विनाशुल्क भोजनाची व्यवस्था केली आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक अशोक अग्रवाल यांनी आपल्या एमआयडीसीमधील रिसॉर्टच्या वतीने रुग्णांसाठी व त्यांच्या सोबतच्या एका व्यक्तीसाठी विनाशुल्क भोजनाची व्यवस्था केली आहे. रुग्णाने किंवा कुटुंबातील सदस्यांनी आपले नाव मोबाइल नंबर व दवाखान्याचे नाव सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत कळविल्यानंतर सकाळ-संध्याकाळ जेवणाचा डबा त्या दवाखान्यात पाठविण्यात येईल, या सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अशोक अग्रवाल यांनी केले आहे.