बसस्थानकात मोकाट जनावरांचा मुक्त संचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:08 AM2017-08-05T00:08:03+5:302017-08-05T00:09:19+5:30

खामगाव : गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा बसस् थानकात वावर वाढला आहे. या जनावरांकडे बसस्थानक  व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी, प्रतीक्षा गृहा तील प्रवाशांसोबतच चालक आणि वाहकांनाही या जनावरांचा  त्रास सहन करावा लागत आहे. 

Free public transport in the bus station! | बसस्थानकात मोकाट जनावरांचा मुक्त संचार!

बसस्थानकात मोकाट जनावरांचा मुक्त संचार!

Next
ठळक मुद्देप्रतीक्षा गृहासोबतच फलाटातही जनावरांचा वावरबसस्थानक व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्षचालक आणि वाहकांनाही त्रास 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा बसस् थानकात वावर वाढला आहे. या जनावरांकडे बसस्थानक  व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी, प्रतीक्षा गृहा तील प्रवाशांसोबतच चालक आणि वाहकांनाही या जनावरांचा  त्रास सहन करावा लागत आहे. 
 खामगाव शहरातील विविध चौकांमध्ये गेल्या काही दिवसां पासून मोकाट जनावरांचा हैदोस आहे. या जनावरांचा वावर  शहरातील मुख्य रस्त्याप्रमाणेच आता बसस्थानक आवारातही  वाढला आहे. 
बसस्थानक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.  त्यामुळे बसस्थानकाच्या आवारातील जनावरे आता प्र तीक्षालयात पोहोचले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, बसच्या  फलाटावरही या जनावरांचे अतिक्रमण असल्याने, बस  फलाटावर लावताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

प्रतीक्षालयात घाणीचे साम्राज्य!
जनावरांमुळे प्रतीक्षालयात जनावरांचे मल-मूत्र पडते. याची  नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे बसस्थानक  आवारासोबतच, फलाट आणि प्रतीक्षालयात घाणीचे साम्राज्य  पसरल्याचे दिसून येते.

शेगाव मार्गावरील उत्पन्न घटले!
बसस्थानक आवारातील मोकाट जनावरांसोबतच, अवैध  प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांकडेही बसस्थानक प्रशासनाचे  दुर्लक्ष आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचा  बसस्थानकाला विळखा असतो. काही वेळा चक्क बसस्थानक  आवारातून प्रवासी पळविल्या जातात. या अवैध प्रवासी वाह तुकीचा सर्वाधिक फटका खामगाव-शेगाव मार्गावर बसला  आहे. परिणामी, खामगाव आगाराच्या उत्पन्नात चांगलीच घट  झाली आहे.
 

Web Title: Free public transport in the bus station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.