शौचालयाचा वापर करणा-या कुटुंबाला पीठगिरणीची मोफत सेवा!
By admin | Published: May 13, 2017 04:44 AM2017-05-13T04:44:05+5:302017-05-13T04:44:05+5:30
रकर, पाणीकर भरून शौचालयाचा नियमित वापर करणाºया कुटुंबासाठी गावात पीठगिरणीच्या मोफत सेवेचा शुभारंभ
सिंदखेड राजा : तालूक्यातील चांगेफळ-बोरखेडी गंडे गट ग्रामपंचायतने बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गावातील रहिवासी असणा-या व घरकर, पाणीकर भरून शौचालयाचा नियमित वापर करणाऱ्या कुटुंबासाठी गावात पीठगिरणीच्या मोफत सेवेचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दमयंती जनार्धन मोगल या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे, ठाणेदार सेवानंद वानखडे, उपअभियंता नागरे, कनिष्ठ अभियंता देवरे, विस्तार अधिकारी भाष्कर घुगे, वन विकास महामंडळाचे संचालक जनार्धनराव मोगल, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त अविनाश नागरे, भगवान नागरे, समीर कुरेशी, ठेकेदार मधुकरराव जाधव, चक्रधर चाळसे हे होते. यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले, की विदर्भ -मराठवाड्याच्या सीमेवर वसलेली चांगेफळ ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवित असल्याचे कौतुक केले. गावाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत.
यामध्ये भाग घेऊन आपल्या गावाचा विकास साधावा, यासाठी गावातील हेवेदावे विसरून विकास कामासाठी ग्रामस्थांनी एकत्रित काम केले पाहिजे. हगणदरीमुक्त, चूलमुक्त, स्वच्छ सुंदर गाव, या उपक्रमामध्ये भाग घेऊन राज्य पातळीवर आपल्या गावाचा नावलौकिक करण्याचे आवाहन केले. पीठगिरणीच्या मोफत सेवा उपक्रमाचा आदर्श इतरही गावांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले, तसेच अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे म्हणाले, की या छोट्याशा गावामध्ये ग्रा.पं. ने मोफत गिरणी चालू केली. यासाठी सात दिवसांत स्वतंत्र शंभरचा ट्रान्सफार्मर देण्याचे आश्वासन दिले. गावासाठी वीज कमी पडू देणार नाही, असे सांगून आकडेमुक्त, मीटरयुक्त गाव ही संकल्पना राबवून विकासासोबतच वेगळा आदर्श निर्माण करावा व इलेक्ट्रिक पंपावर कॅपिशीटर बसवून वीज बचत करावी, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वन विकास महामंडळाचे संचालक जनार्धन मोगल यांनी केले, तर सूत्रसंचालन ग्रामसेवक व्ही.एस. सातपुते यांनी केले.
यावेळी ज्ञानदेव मोगल, रमेश तायडे, विश्वास शेजूळ, दिनकर मोगल, अच्युतराव मोगल यांच्यासह असंख्य गावकरी हजर होते.