१३ सरकारी रुग्णालयात फ्री आणि १५ खासगी रुग्णालयात २५० रुपयांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:40 AM2021-03-01T04:40:37+5:302021-03-01T04:40:37+5:30
दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यात कोरोन प्रतिबंधक लस ही ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच दुर्धर आजार असलेले ४५ वर्षावरील नागरिक ...
दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यात कोरोन प्रतिबंधक लस ही ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच दुर्धर आजार असलेले ४५ वर्षावरील नागरिक यांना दिली जाणार आहे. जिल्ह्यात दुर्धर आजार असणाऱ्यांची संख्या ५६ हजारांच्या आसपास आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी २५० रुपये आकारण्यात येणार असून १५० रुपये लसीची किंमत तर १०० रुपये हे सेवेसाठी आकारण्यात येतील. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पंतप्रधान जनआरोग्य योजनेतंर्गत नोंदणीकृत असलेल्या १५ खासगी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुषंगाने २८ फेब्रुवारीला सायंकाळी या रुग्णालयांमधील डॉक्टरांचेही प्रशिक्षण घेण्यात आले.
-- येथे मिळणार कोरोना लस--
सरकारी रुग्णालये
१) जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा
२) ग्रामीण रुग्णालय, चिखली
३) ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा
४) ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद
५) सामान्य रुग्णालय, खामगाव
६) ग्रामीण रुग्णालय, लोणार
७) ग्रामीण रुग्णालय, मलकापूर
८) ग्रामीण रुग्णालय, मेहकर
९) ग्रामीण रुग्णालय, मोताळा
१०) प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदुरा
११) प्राथमिक आरोग्य केंद्र, संग्रामपूर
१२) ग्रामीण रुग्णालय, शेगाव
१३) ग्रामीण रुग्णालय, सिंदखेड राजा
--खासगी रुग्णालये--
१) सिटी हाॅस्पिटल, बुलडाणा
२) अमृत ह्रदयालय ॲन्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, बुलडाणा
३) संचेती ह्रदयालय, बुलडाणा
४) मेहेत्रे हॉस्पिटल, सुवर्णनगर बुलडाणा
५) मानस हॉस्पिटल, मलकापूर
६) कोलते हॉस्पिटल, मलकापूर
७) आस्था ॲक्सीटेंड हॉस्पिटल
८) चोपडे हॉस्पिटल, ४० बिघा, मलकापूर
९) कोठारी हॉस्पिटल, चिखली
१०) तुळजाी हॉस्पिटल, चिखली
११) राठोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मेहकर
१२) मेहकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मेहकर
१३) माऊली डायलेसीस सेंटर, शेगाव
१४) सोनटक्के चिल्ड्रन हॉस्पिटल, खामगाव
१५) सिल्व्हर हेल्थ केअर, गोकुळ नगर, खामगाव
--पहिल्या टप्प्यातील चार हजार बाकी--
कोरोना लसिकरणाच्या पहिल्या टप्प्यातील चार हजार कर्मचाऱ्यांना अद्याप लस देणे बाकी आहे. आतापर्यंत १५ हजार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कस, पोलिस कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात लसीचे ४३ हजार ३०० डोस उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यातील दुसरा डोस देण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे.
-- नोंदणी कशी करणार--
इच्छुक लाभार्ती कोवीन २.० आणि आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करू शकतात. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रात जावूनही नोंदणी करता येईल. ४५ वर्षावरील व दुर्धर आजार असणाऱ्यांनी नोंदणी करताना त्यांना दुर्धर आजार असल्याचे प्रमाणपत्रही ही पुरावा म्हणून अपलोड करावा लागले. एका मोबाईलवरून चार जणांची नोंदणी केली जावू शकले, अशी चर्चा आहे.