अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:56 PM2018-11-21T14:56:08+5:302018-11-21T14:57:17+5:30

आध्यात्मिक जीवन हे खºया अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ...

freedom from ego is the foundation of spiritual life! | अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया!

अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया!

Next

आध्यात्मिक जीवन हे खºया अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ईश्वराला जीवन समर्पित करणे ही ईश्वर आणि मनुष्य जीवनातील आंतरक्रिया आहे. या प्रक्रियेत ईश्वर आणि मनुष्य यातील अंतर नाहीसे होते आणि म्हणूनच साधू...संत आणि सृजनशील व्यक्तींच्या मनाला कुणाचेही अहीत करण्याचा विचार स्पर्शत  नाही. आध्यात्मिक जीवनात मी ईश्वर रुप आहे. या आंतरिक भावाचे प्रकटीकरण होते. मनातील सर्व विकार, विषय, वासना आपोआप नाहीशा होतात. त्यामुळेच मनुष्य ब्रम्ह स्वरूप होते. भूतकाळ आठवणीत राहत नाही. तर भविष्यकाळाच्या बाबतीत अनिश्चितता असते. त्यामुळे आध्यात्मिक जीवनातील व्यक्ती वर्तमान काळालाच अधिक महत्व देते.  थोडक्यात भूत आणि भविष्य काळात ती गुरफटत नाही. मोक्षप्राप्तीसाठी त्यांची धडपड असते. 

सत्य हे शिव आहे आणि शिव हे सुंदर आहे. यावरच आध्यात्मिक जीवनातील व्यक्तीचा भर राहतो. सत्य  हेच शाश्वत जीवन असल्याचे ते मानतात. थोडक्यात अंहकार मुक्तता हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया होय.

तुम्ही जर एखादा विचार करत असाल आणि काहीतरी वेगळीच कृती करणार असाल, तर तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही अशांत असाल, तुम्हाला थकवा जाणवेल. जेव्हा मन, वचन आणि कर्म जेव्हा एकरुप होते तेव्हा तुमचे मन प्रसन्न असते. जीवनात अशी प्रसन्नता असेल, समाधान असेल तर अशा आनंदामुळे आपला उत्साह द्विगुणित होतो.  हाच उत्साह एवढा बलवान होतो की प्रगतीच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी त्याने काहीही बिघडत नाही. 

राग आणि अहंकार एकमेकांना पूरक आहेत. रागीट व्यक्ती फक्त आपला मी पणा सिद्ध करण्यासाठी राग व्यक्त करतो. राग अशासाठी येतो कारण ती व्यक्ती त्यातल्या अहंकाराला वाचविण्याचा प्रयत्न करते.  अहंकार ही माणसाची खोटी ओळख आहे.  तर खोट्या ओळखीसह जीवन जगणं म्हणजे जीवन निरर्थक आहे. आणि या खोट्या ओळखीपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे निस्वार्थ प्रेम भाव होय. आपण चांगल्या भावनेने निस्वार्थ भावनेने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे समजावे. व्यक्तीला शांती, आनंद आणि सुख हवे असेल तर त्याला आनंद सुखी करु शकतो. ज्ञान, निष्ठा त्याला शांत करेल आणि भक्तीमुळे त्याला आनंद होईल. आपण अशा प्रकारे कर्म करावे संसारात राहून सुखाचा आनंद कशाप्रकारे घ्यावा ही युक्ती आपल्याला कर्मयोगातून कळते.


-श्री राधे राधे महाराज, श्री बर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि.बुलडाणा.

Web Title: freedom from ego is the foundation of spiritual life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.