बंदीजनांची केली पुस्तकांशी मैत्री

By admin | Published: December 31, 2014 12:13 AM2014-12-31T00:13:57+5:302014-12-31T00:13:57+5:30

राज्यातील कारागृहात वाचले जातात २२ हजार पुस्तके !

Friendships made with the books of captivity | बंदीजनांची केली पुस्तकांशी मैत्री

बंदीजनांची केली पुस्तकांशी मैत्री

Next

नीलेश शहाकार/बुलडाणा : राज्यातील विविध कारागृहात हजारो बंदिस्त कैदी आपले एकटेपण घालविण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करतात. या बंदीजनाकडून विविध विषयावरील २२ हजार पुस्तके वाचले जात आहेत. यामुळे भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
समाजात कायदा-सुव्यवस्था राखण्यात कारागृह घटक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे कोणी गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून गुन्हेगाराला कारागृहात पाठविले जाते. ठोठावलेल्या शिक्षेसह त्यांच्यात मानसिक विकास घडवून यावा यासाठी वाचन, शारीरिक आणि बौद्धिक खेळ, सांस्कृतिक उत्सवावरही कारागृहात भर दिला जातो.
ह्यइट का जबाब पत्थर से देनाह्ण हेच लक्ष्य असणार्‍या बंदीस्त कैद्यांच्या जीवनात शिक्षणाची कास धरून जीवनाचा खरा अर्थ देण्याचा प्रयत्न कारागृहातील वाचनालयातून सुरु आहे. बंदिवान दिवसभर काम करतात. खेळ, विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात व वेळ मिळेल तेव्हा आवडत्या विषयाचे पुस्तक वाचन करतात. या वाचनातूनच जीवन विकासाची लढाई जिंकण्यासाठी बंदीजनांचा संघर्ष सुरु आहे.
कायम बंदीवास, अंधार कोठडी, कठोर शासन अशी कारागृहाबाबत असलेली भितीदायक संकल्पना पूर्णपणे बदलली जात आहे. आज कारागृहांमध्ये कैद्याच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे लक्ष दिले जात आहे. त्यातून त्यांच्यासाठी पुस्तक, मासिक, वर्तमानपत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेवून कैद्यांच्या आवडीनिवडी व मागणीनुसार विविध विषयांची पुस्तक पुरविण्यात येत असल्याचे जिल्हा कारागृहाचे पोलिस अधिक्षक आशिष गोसावी यांनी सांगीतले.

*एक वर्षापासून नवीन पुस्तक नाही
कैद्याच्या मानसिक विकासाची भाषा बोलली जात असताना यात काही त्रुटीही निर्माण झाल्या आहेत. राज्यातील ४३ पैकी २७ कारागृहात गेल्या एक वर्षापासून नवीन पुस्तकांची भर पडली नाही. यामध्ये येरवाडा, मुंबई, अमरावती येथील मध्यवर्ती कारागृह, कल्याण, भायखळा, रत्नागिरी, धुळे, अकोला, भंडारा, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद येथील वर्ग १ जिल्हा कारागृह, अलिबाग, सावंतवाडी, परभणी, उस्मानाबाद, बीड, जळगाव, विसापूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, येरवाडा कोल्हापूर, नाशिक रोड, नागपूर, अमरावती येथील खुले कारागृहांचा समावेश आहे.

Web Title: Friendships made with the books of captivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.