मलकापुरात छेडखानी विरोधात धडक मोहीम
By admin | Published: January 23, 2016 02:09 AM2016-01-23T02:09:21+5:302016-01-23T02:09:21+5:30
एकाच दिवशी २0 जणांवर कारवाई.
मलकापूर : शहर पोलिस स्टेशनतंर्गत छेडखानी विरोधी पथकाच्यावतीने २१ जानेवारी रोजी धडक मोहिम राबविण्यात आली. या कारवाई दरम्यान, दिवसभरात विविध ठिकाणी तब्बल २0 जणांवर कलम ११0, ११७ भादंवि अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. मलकापूर शहरातील जनता कॉलेज, जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल, मुक्ताई नगर बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदी परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड व गैरवर्तवणूक करताना तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आल्याप्रकरणी पोउपनि कलावती पिल्ले यांचे नेतृत्वात पोहेकॉ ब्रिजलाल मापारी व तय्यब अली यांच्या पथकाने अंकुश वानखेडे, आकाश लटके, दिनेश यादव, रमेश वाघमारे, संभाजी हापरे, संदीप धाडे, शे.इमाम शे.शाकीर, शे.आरीफ शे. मेहमुद, धिरज टाकसाळे, राज डोंगरे, शे.समीर शे.आमीर, शे.रिझवान शे.बिसमिल्ला, शे.मोबीन शे.सत्तार, साहीलखां हबीबखां, सारंग पाटील, गजानन जोशी, विपूल शेवरे, तुषार कुंभारे, शुभम इंगळे, आकाश पाटील आदी २0 जणांवर प्रतिबंधक कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील चिडीमारांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई आणखी तीव्र करण्याची मागणी जोर धरत आहे.