महावितरण कार्यालयावर मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:23 AM2017-10-18T01:23:00+5:302017-10-18T01:23:34+5:30

धाड : दिवाळी सणाच्या तोंडावर वीज वितरण कंपनीकडून  होणार्‍या अर्मयाद भारनियमनासह महावितरणकडून निर्माण  झालेल्या अनेक समस्यांच्या विरोधात १६ ऑक्टोबर रोजी धाड  जि.प.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महावितरण कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला.

Front of the office of the Mahavitaran! | महावितरण कार्यालयावर मोर्चा!

महावितरण कार्यालयावर मोर्चा!

Next
ठळक मुद्देमहावितरण विरोधात शेकडो ग्रामस्थांचा ‘एल्गार’ धाड परिसराला भारनियमनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : दिवाळी सणाच्या तोंडावर वीज वितरण कंपनीकडून  होणार्‍या अर्मयाद भारनियमनासह महावितरणकडून निर्माण  झालेल्या अनेक समस्यांच्या विरोधात १६ ऑक्टोबर रोजी धाड  जि.प.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महावितरण कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मोच्रेकर्‍यांच्या समस्यांना व प्रश्नांना येथील अधिकार्‍याने  समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने जमाव  संतप्त झाला व शेकडो नागरिकांनी वीज कंपनीचे कार्यालयाचे  परिसरात ठिय्या मांडला. अखेर स्थानिक पोलीस स्टेशन ठाणेदार  संग्राम पाटील व पत्रकार बांधवांनी या ठिकाणी मध्यस्थी करत  परिस्थिती शांत करत या ठिकाणी अधिकार्‍यांना मोर्चेकर्‍यांशी  चर्चेस आणले. यावेळी सरपंच रिजवान सौदागर, नईम खान,  प्रमोद बोर्डे, रमेश सनान्से, प्रभाकर वाघ, म.आसीफ, प्रभाकर  जाधव, महेंद्र बोर्डे, सुखराम गुजर यांच्यासह अनेक गावाचे सर पंच यांनी सहायक अभियंता राजेश दहीकर यांना निवेदन देऊन  धाड येथील वीज वितरण कंपनीत सिंगल फेज योजनेत होणारे  भारनियमन, पाणी पुरवठय़ाची वीज सुरळीत ठेवणे, नादुरूस्त  विद्युत मीटर ग्राहकांवर केलेली अनुचित कारवाई,मनमानी  आकारलेला दंड, ग्राहकांना बिलात लावण्यात येणारे व्याज,  मीटरअभावी खोळंबलेल्या विद्युत जोडण्या, अवास्तव कारवाई  व अधिकार्‍यांसह कर्मचारी मुख्यालयी न राहणे आदी विषयांवर  चर्चा केली. तसेच याठिकाणी वीज वितरणाचा कारभारच ढे पाळल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यावर अधिकारी वर्गाचे  नियंत्रण नसल्याने जनक्षोभ वाढीस लागला आहे. वीज  ग्राहकांना सुविधा देण्याऐवजी त्यांना त्रास देण्याच्या प्रकाराने  नागरिक रस्त्यावर उतरले असून, यावर वरिष्ठांनी तत्काळ  कारवाई करण्याची मागणी येथे करण्यात आली. दिवाळी सणात  विजेसाठी नागरिकांना हा मोर्चा काढावा लागला. 

आठ दिवसात विजेच्या संदर्भातील समस्या मार्गी न लागल्यास  तीव्र स्वरूपात जनांदोलन छेडणार.
-रिझवान सौदागर, सरपंच, धाड.
-

Web Title: Front of the office of the Mahavitaran!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.