फळांची विक्री वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:57+5:302021-03-31T04:34:57+5:30
सुंदरखेड येथे आठ पॉझिटिव्ह बुलडाणा : तालुक्यातील सुंदरखेड येथे आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना बुलडाणा येथील कोविड ...
सुंदरखेड येथे आठ पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यातील सुंदरखेड येथे आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना बुलडाणा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. प्रत्येकाने मास्क वापरावा, गर्दी करू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
विद्युत ग्राहकांना अवाजवी विद्युत बिले
देऊळगाव राजा : तालुक्यात महावितरण कंपनीकडून घरगुती विद्युत मीटरचे रिडिंग न घेताच ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल देण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. मागील वर्षी एकत्रित विद्युत बिलामुळे अनेकांची देयके थकलेली आहेत.
घरकूल योजनेपासून लाभार्थी वंचित
सिंदखेड राजा : तालुक्यातील अनेक लाभार्थी राजीव गांधी घरकूल योजनेपासून वंचित आहेत. याकडे लक्ष देऊन लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान वाटप करुन घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी प्रभाकर इंगळे यांनी केली आहे.
उन्हाळ्यात पांदन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज
लोणार : सध्या शेतमाल घरी आलेला आहे. आता बहुतांश शेती रिकामी झालेली आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात पांदन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. तालुक्यातील अनेक शिवारात धुऱ्यालगत असलेल्या शिव व पांदन रस्त्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. परिसरातील पांदन रस्ते अतिक्रमणात गडप होत असून, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अल्प पावसातही चिखलाने तुंबणारी व अतिक्रमणात अडकलेले रस्ते शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतात. अतिक्रमणात अडकलेले रस्ते शेतकऱ्यांच्या विकासातील सर्वात मोठी अडचण आहे.
स्वस्त धान्य दुकानात नियमांचे उल्लंघन
मेहकर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात नियमांचे उल्लंघन होत आहे. परिसरातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये स्वस्त धान्याची जादा दराने विक्री करण्यात येते. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पेट्रोल विक्रीवर ग्राहकांचे लक्ष
डोणगाव : येथून जाणाऱ्या महामार्गावर बऱ्याच ठिकणी पेट्रोलची खुलेआम अवैध विक्री करण्यात येत आहे. हे पेट्रोल भेसळयुक्त असून, यामुळे प्रवाशांची लूट होत आहे. अनेक ठिकाणी बॉटलमध्ये हे पेट्रोल दिले जाते. परंतु आता पेट्रोल महाग झाल्यापासून ग्राहकांचे या पेट्रोल विक्रीवर लक्ष आहे.
वाहतुकीला शिस्त केव्हा लागणार
बुलडाणा : वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बुलडाणा शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलीस दिसून येत आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक पोलीस हजर असतात. परंतु वाहतूक कोंडीची समस्या कायम राहात आहे. बुलडाण्यातील वाहतुकीला शिस्त केव्हा लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोताळा तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले
माेताळा : परिसरात गत काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील अनेक गावांतून हजाराे रुपयांचा एवज चाेरट्यांनी लंपास केला आहे. त्यामुळे, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हरभरा कुटार भिजल्याने नुकसान
धाड : काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतात असलेले हरभरा कुटार, तर कुठे इतर चारा भिजला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील कडबा भिजला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे चाराटंचाईची शक्यता आहे.
उमरद येथे कोरोना पॉझिटिव्ह
किनगाव राजा : सिंदखेड राजा तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. किनगाव राजापासून जवळ असलेल्या उमरद येथे सोमवारी एक काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.