चिखली शहरातील मुख्य रस्त्यासाठी ४ कोटी ९१ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:12+5:302021-06-11T04:24:12+5:30
त्यानुषंगाने पहिल्यापासूनच रस्त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून, मध्यंतरीचा कोरोनाचा काळ वगळता महाविकास आघाडी व भाजप शासनाकडून चिखली नगरपालिकेला निधी उपलब्ध ...
त्यानुषंगाने पहिल्यापासूनच रस्त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असून, मध्यंतरीचा कोरोनाचा काळ वगळता महाविकास आघाडी व भाजप शासनाकडून चिखली नगरपालिकेला निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बोंद्रे यांनी दिली आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जयस्तंभ चौक रस्ता कामासाठी ४ कोटी ९१ लाख निधी उपलब्ध झाला आहे. शहरातील रस्त्यांचे रूप बदलण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत एकूण १६ कोटी रुपयांची कामे शासनाकडे सादर केली होती. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हा केंद्रीय बँकपर्यंतचा रस्ता व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सिद्ध सायन्स मंदिरपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. याअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील कामालाही निधी प्राप्त झाल्याने लवकरच कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा बोंद्रे यांनी स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, माजी आ. चैनसुख संचेती यांच्यासह पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. श्वेता महाले यांचे यासाठी योगदान लाभल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
स्वप्नपूर्तीचा आनंद : प्रिया बोंद्रे
मागील अनेक वर्षांपासून चिखलीकरांना रस्त्यांची समस्या जाणवत होती. या रस्ता कामामुळे त्रासही सोसावा लागला. याबाबत दिलगिरी व्यक्त करतानाच, रस्त्यांच्या प्रमुख समस्येकडे प्राधान्याने लक्ष देऊन चिखलीकरांना दिलेला शब्द पाळला जाणार असल्याने 'खड्डेमुक्त चिखली, धूळमुक्त चिखली' शहराचे स्वप्न पूर्णत्वास जात असल्याचे समाधान नगराध्यक्षा बोंद्रे यांनी व्यक्त केले आहे.