कृत्रिम पाणीटंचाईमुळे रोष

By admin | Published: September 8, 2014 01:48 AM2014-09-08T01:48:11+5:302014-09-08T01:48:11+5:30

अमडापूर गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा

Fury caused by artificial water shortage | कृत्रिम पाणीटंचाईमुळे रोष

कृत्रिम पाणीटंचाईमुळे रोष

Next

अमडापूर: अमडापूर गावासाठी १ कोटी २२ लक्ष रुपयांची नळयोजना कव्हळा धरणावरून कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र धरणात मुबलक साठा असतानाही नागरिकांना आठवड्यातून केवळ एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा केल्या जात असतानाही पाणी पट्टीचे बिल ३0 दिवसांचे वसूल केल्या जात आहे. उल्लेखनीय म्हणजे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणारे पाणी अतिशय अशुद्ध आणि गढूळ आहे. पिण्यायोग्य पाणी दिल्या जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. सणासुदीच्या दिवसात नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विहिरींमध्ये आता पावसाळा सुरू असल्याने ब्लिचिंग पावडर नियमित टाकल्यास विहिरीतील पाणी शुद्ध राहून आरोग्यास येत असलेला धोका टळू शकतो. याकरि ता ग्रा.पं.तीने लक्ष देण्याची गरज असून, राजकारणाकडे थोडे लक्ष कमी करून गावकर्‍यांची पाणी समस्या सोडवावी, अशी गावकर्‍यांची रास्त मागणी आहे.
आठवडी बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावामध्ये ताप, थंडी, सर्दी, खोकला अशा आजारांची साथ सुरू असून, गावातील नाल्या, रस्त्यावर खड्डय़ामध्ये थांबलेले पावसाचे पाणी व होत असलेल्या घाणीवर ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी. तसेच आता गणपतीचे विसर्जन ९ सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठीसुद्धा ग्रामपंचायतीने रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ावर उपाययोजना करावी. गणपती मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडीअडचण निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Fury caused by artificial water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.