बॅंकामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:31+5:302021-06-25T04:24:31+5:30
साखरखेर्डा : येथील भारतीय स्टेट बँकेच्या समोर ग्राहकांना भरपावसात उभे राहून व्यवहार करावे लागत असून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा ...
साखरखेर्डा : येथील भारतीय स्टेट बँकेच्या समोर ग्राहकांना भरपावसात उभे राहून व्यवहार करावे लागत असून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे़ त्यामुळे, कोरोना संसर्गजन्य आजार फैलावू शकतो अशी भीती ग्राहकांनी व्यक्त केली आहे. बॅंक अधिकाऱ्यांनी ग्राहकांना पावसापासून बचाव करण्यासाठी टिन शेड लावण्यात यावे अशी मागणी होत आहे.
साखरखेर्डा गावाची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास असून ३५ गावे या बॅंकेच्या अखत्यारीत आहेत. एकमेव राष्ट्रीयीकृत बॅंक असल्याने शेतकरी कृषी कर्जासाठी फेऱ्या मारत आहे. बॅंक ड्राप काढणे , आरटीजीएस काढणे, बॅंक खात्यात पैसे जमा करणे, पैसे काढणे या व्यवहारासाठी बॅंकेत दररोज प्रचंड गर्दी असते . कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी बॅंकेत एक किंवा दोन व्यक्तींपेक्षा इतरांना प्रवेश दिला जात नाही. इतर लोकांना भरपावसात उभे राहावे लागते. महिलांनाही कोणतीही सुरक्षितता या शाखेत नाही. महिलांना भरपावसात उभे करण्यात येते. साखरखेर्डा येथील लोकसंख्या गृहीत धरून शासनाने पुन्हा एक राष्ट्रीयीकृत बॅंक मंजूर करावी आणि ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी केली आहे.
काेट
गुरूवारी सकाळी नऊ वाजता पासून बॅंकेच्या बाहेर उभे राहून बॅंकेत खाते उतारा मिळावा म्हणून उभा राहिलो. तब्बल दोन वाजता आत प्रवेश मिळाला . पावसाच्या सरीने सर्वच ओलेचिंब झाले . आत प्रवेश केला तर बॅंक मॅनेजर नाही , फिल्ड अधिकारी नाही , त्यामुळे परत जावे लागले .
दामुअण्णा शिंगणे,
जिल्हाध्यक्ष वारकरी महामंडळ