Gadar 2 : हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा... बैलगाडीचं चाक उचलून लढताना दिसला 'गदर-२' मधला 'तारा सिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:25 AM2023-01-04T11:25:48+5:302023-01-04T11:26:50+5:30

गदर मध्ये हॅंडपंप उचलणारा 'तारा सिंह' गदर २ मध्ये चक्क हातात बैलगाडीचे चाक घेऊन लढताना दिसत आहे. सनीचा आक्रमक अवतार आता गदर २ मध्येही बघायला मिळणार आहे.

Gadar 2: Long live Hindustan... Tara Singh from 'Gadar-2' was seen fighting by lifting the wheel of a bullock cart. | Gadar 2 : हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा... बैलगाडीचं चाक उचलून लढताना दिसला 'गदर-२' मधला 'तारा सिंग'

Gadar 2 : हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा... बैलगाडीचं चाक उचलून लढताना दिसला 'गदर-२' मधला 'तारा सिंग'

googlenewsNext

Gadar 2  : २००१ मध्ये आलेला गदर सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांनी 'गदर' मध्ये अशी काही अभिनयाची जादू दाखवली आणि हा सिनेमा चांगलाच गाजला. सनी देओलचे अॅक्शन सीन्स असो, दोघांचा रोमान्स असो किंवा मग सिनेमातील गाणी हे सर्व प्रेक्षकांच्या मनात १२ वर्षांनंतर सुद्धा घर करुन आहे. तर आता चाहत्यांसाठी गदरचा सीक्वल लवकरच येतोय. 'गदर २' मधील सनी देओलचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झालाय. 

गदर २ हा सिनेमा २०२३ म्हणजे याचवर्षी प्रदर्शित होणार आहे मात्र याची रीलीज डेट अजून समोर आलेली नाही. दरम्यान आता मेकर्सने गदर २ ची पहिली झलक दाखवली आहे. गदर मध्ये हॅंडपंप उचलणारा 'तारा सिंह' गदर २ मध्ये चक्क हातात बैलगाडीचे चाक घेऊन लढताना दिसत आहे. सनीचा आक्रमक अवतार आता गदर २ मध्येही बघायला मिळणार आहे. ही पहिली झलक पाहिल्यानंतर तर सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली आहे. 

सिनेमाची झलक जशी समोर आली सोशल मीडियावर तारा सिंह पुन्हा व्हायरल होऊ लागला. ट्विटरवर #gadar2 ट्रेंडिंग व्हायला लागला आहे. एका चाहत्याने लिहिले, 'सनी पाजी चा जलवा परत आलाय. गदर २ ची पहिली झलक '

गदर २ हा पहिल्या गदर चा सीक्वल आहे. त्यामुळे आता गदर २ मध्ये तारा सिंह त्याची पत्नी सकीना आणि त्यांचा मुलगा यांची पुढची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. आपले प्रेम परत आणण्यासाठी तारा सिंहने मुलाला घेऊन पाकिस्तानची सीमा ओलांडली होती आणि सर्वांशी लढा देत, देशाचे नाव राखत त्याने आपल्या पत्नीला परत आणले होते. गदर २ आता यापुढची कहाणी असणार आहे ज्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांची महत्वाची भूमिका आहे. उत्कर्ष म्हणजेच गदर मधला चीते ज्याने लहान मुलाची भूमिका साकारली होती. आता ही चीते मोठा झाला आहे. गदर २ चे शूट लखनऊमध्ये सुरु आहे. लखनऊच्या मार्टिनियर कॉलेजलाच पाकिस्तान सेनेचे मुख्यालय बनवून तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता.

Web Title: Gadar 2: Long live Hindustan... Tara Singh from 'Gadar-2' was seen fighting by lifting the wheel of a bullock cart.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.