सिंधुताई जाधव महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:35 AM2021-02-24T04:35:55+5:302021-02-24T04:35:55+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. एस. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. एस. एम. खडसे यांची उपस्थिती होती. गाडगेबाबांची दशसूत्री प्रत्यक्ष अमलात आणणे गरजेचे आहे. आजही समाजात दीनदुबळे, उपेक्षित, दुर्लक्षित, वंचित लोकांचे प्रमाण भरपूर आहे. त्यांना आधार मिळणे गरजेचे असल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.आर. लाहोरकर यांनी होते. त्यांनी गाडगेबाबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी प्रा. डॉ. आर. जी. सुरळकर, डॉ. बी. डब्ल्यू. सोमटकर, प्रा. डॉ. पी. आर. जूनघरे, प्रा. डॉ. एम. आर. शिंदे, प्रा. व्ही. आर. मोरे, प्रा. डॉ. जैताळकर, प्रा. डॉ.मोहिते, प्रताप पाटील, दीपक चनखोरे, गजानन दुतोंडे, सचिन राठोड, संतोष फलटणकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. देशमुख यांनी केले. आभार प्रा. रहाटे यांनी मानले.