ज्ञानामृताचा खरा डोस देणारे संत म्हणजे गाडगेबाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:43 AM2021-02-25T04:43:43+5:302021-02-25T04:43:43+5:30

दुसरबीड : येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय नागरे यांच्या विशेष ...

Gadge Baba is the saint who gives the true dose of enlightenment | ज्ञानामृताचा खरा डोस देणारे संत म्हणजे गाडगेबाबा

ज्ञानामृताचा खरा डोस देणारे संत म्हणजे गाडगेबाबा

Next

दुसरबीड : येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय नागरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा आदर्श ठेवला. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गणेश घुगे यांनी केले. प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केले. यावेळी प्रा. डॉ. देशमाने, प्रा. वाघ, पोलीस व गजानन राठोड, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद गवई, प्रा. शेख युनूस, प्रा. शिंदे, प्रा काळुसे, अनिल रणमळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन रविराज चव्हाण यांनी केले.

Web Title: Gadge Baba is the saint who gives the true dose of enlightenment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.