‘श्रीं’ ची पालखी मंगळवारी शेगावात; संस्थानकडून स्वागताची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:44 PM2019-08-02T16:44:49+5:302019-08-02T16:44:54+5:30

शेगाव : संत गजानन महाराजांची पालखी ६ आॅगस्ट रोजी शेगावला पोहचणार असून स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Gajanan maharaj palkhi will arrive in shegaon on Tuesday; Preparation of a welcome | ‘श्रीं’ ची पालखी मंगळवारी शेगावात; संस्थानकडून स्वागताची जय्यत तयारी

‘श्रीं’ ची पालखी मंगळवारी शेगावात; संस्थानकडून स्वागताची जय्यत तयारी

googlenewsNext

- गजानन कलोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : संत गजानन महाराजांची पालखी ६ आॅगस्ट रोजी शेगावला पोहचणार असून स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी गज व अश्वासह ८ जून रोजी ६०० च्यावर वारकऱ्यांसह मार्गस्थ झाली होती. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे १६ जुलै रोजी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघाली. ६ आॅगस्ट रोजी संतनगरीत लाखो भाविकांसह दाखल होणार आहे. श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५२ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीने जिल्ह्यात आगमन केले आहे. टाळकरी विठ्ठल नामाचा महिमा गात श्री गजानन महाराजांचा नामघोष करीत ३१ रोजी किनगाव जट्टू येथून लोणार येथे मुक्कामी होते. १ आॅगस्ट सुलतानपूर येथून मेहकर येथे मुक्काम व २ आॅगस्ट नायगाव दत्तापूर व जानेफळ मुक्काम, ३ आॅगस्ट वरवंड व शिर्ला नेमाने येथे मुक्काम, ४ आॅगस्ट विहिगाव व आवार येथे मुक्काम व ५ आॅगस्ट खामगाव येथे मुक्कामी राहणार आहे. ६ आॅगस्ट रोजी खामगाव येथून पहाटे ५ वाजता खामगाव शहरातून नगरपरिक्रमा करुन शेगाव संतनगरीकडे मार्गस्थ होणार आहे. खामगाव ते शेगाव या १६ की.मी. अंतरावर लाखोभक्तांच्या मानवी साखळी भक्तांच्या भक्तीसागर श्रींच्या पालखी समवेत हा पाहावयास मिळणार आहे. वाटेत श्रींच्या भक्तांकडून चहापाण, फराळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आरोग्य तपासणी बाबत तयारी होत आहे. संतनगरीत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने वारकरी शिक्षण संस्था (गजानन वाटीका) याठिकाणी श्रींच्या पालखीसमवेत येणाºया भाविकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.


श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा
६ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता शेगावात श्री गजानन महाराज पालखीची नगरपरिक्रमा सुरुवात होईल. याठिकाणी भक्तांच्या उपस्थिती वारकऱ्यांचा टाळ मृदंगाच्या तालावर श्रींचा नामघोष विठ्ठल नामाचा जयघोष हरिनामाचा नामघोष करीत पारंपारीक मार्गाने श्रींची पालखीचे स्वागत होवून सायंकाळी श्रींच्या मंदिरात पालखी सोहळा पोहचणार आहे.श्रींच्या ५२ व्या वर्षाच्या श्री क्षेत पंढरपूर पायदळ यात्रा सोहळा हा वारकºयांच्या टाळमृदंगाच्या तालावर पालखी हा खेळत आकर्षक रिंगण सोहळा होवून श्रींच्या महाआरती सोळा घेवून श्रींच्या पालखीची सांगता होणार आहे.

Web Title: Gajanan maharaj palkhi will arrive in shegaon on Tuesday; Preparation of a welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.