अमेरिकेत रंगला गजानन महाराजांचा पालखी सोहळा
By admin | Published: September 9, 2014 01:16 AM2014-09-09T01:16:20+5:302014-09-09T19:17:20+5:30
१२५ भक्तांचा सहभाग : धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
बुलडाणा: विदर्भाचा पंढरीनाथ ङ्म्री संत गजानन महाराजांच्या भक्ती व ङ्म्रद्धेचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून, अमेरिकेत महाराजांचा पहिला पालखी सोहळा भारतीय वेळेनुसार ७ सप्टेंबर रोजी अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
ङ्म्री गजानन महाराज अमेरिका परिवाराच्यावतीने या पालखी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेतील इर्वीन, कॅलिफोर्निया येथे आयोजित या सोहळय़ामध्ये अमेरिकेत स्थायिक असलेल्या महाराजांच्या १२५ भक्तांनी सहभाग घेतला. या भक्तांनी ह्यगण गण गणात बोतेह्ण चा गजर करून ङ्म्री गजानन नामाचा जयघोष केला. पालखी सोहळय़ास प्रारंभ करण्यापूर्वी ङ्म्री गणपती अथर्वशीर्ष, ङ्म्री गजानन आवाहन, ङ्म्री गजानन महाराज १0८ नामावलीसह पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ह्यगण गण गणात बोतेह्णचा नामघोष करीत ङ्म्री गजानन अष्टक, गजानन बावन्नीचे सामूहिक गायन करून पालखी सोहळय़ाला प्रारंभ झाला. पालखीची परिक्रमा झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
नवीन पिढीला ङ्म्री संत गजानन महाराजांनी केलेले उपदेश आणि त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी, ङ्म्रद्धा आणि भक्ती परंपरा कायम राहावी, या उद्देशाने हा परिवार कार्यरत असून, परिवारातील कुणालाही नावाच्या प्रसिद्धीचा हव्यास नाही. या परिवारातील भक्तांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना याचा आवर्जून उल्लेख केला. ङ्म्रींच्या भक्तीचा प्रसार व्हावा, हाच या परिवाराचा निर्मळ उद्देश असल्याने अमेरिकेतील हा पहिला पालखी सोहळा देशभरातील भक्तांसाठीही प्ररेणादायी असाच ठरला आहे.
अशी आहे पालखी
** अमेरिकेत निघालेल्या पहिल्या पालखी सोहळय़ासाठी वापरण्यात आलेली पालखी लाकडाची असून, ती भारतातच तयार करण्यात आली आहे. येथील एका भक्ताने ती पालखी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पाठविली आणि तेथून ही पालखी ङ्म्री गजानन महाराज अमेरिका परिवाराकडे आली. या पालखीमध्ये गजानन विजय गं्रथ व ङ्म्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या. पालखी सोहळय़ात भगवी पताका, पालखीसोबतचा चांदीचा राजदंड व पालखीवर नक्षीदार छत्र आणि अंबरही होते. या परिक्रमेची अमेरिकेतील नागरिकांमध्येही उत्सुकता होती. त्यांनी या पालखी सोहळय़ाची माहितीही जाणून घेतली.
** असा आहे अमेरिका परिवार
ङ्म्री गजानन महाराज अमेरिका परिवार या नावाने ओळखल्या जाणार्या या परिवाराची स्वतंत्र वेबसाईट आहे. दर महिन्याला गजानन महाराज नामजप सोहळा इंग्लंडमधील संदरलॅन्ड, अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडा, लॉस एंजेलिस, सन फ्रान्सिस्को आदी ठिकाणी आयोजित केला जातो. प्रत्येक ठिकाणी किमान ४0 पेक्षा जास्त भक्त सहभागी होतात. यासोबतच वेबकॉन्फरन्सिंगमार्फत संपूर्ण जगभरातून महाराजांचे भक्त या परिवाराशी ह्यकनेक्टह्ण आहेत. विशेष म्हणजे सर्व भक्तांसाठी दररोज ३0 मिनिटे ह्यगण गण गणात बोतेह्ण हा नामजप टेली कॉन्फरन्समार्फत केला जातो.