अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू
By admin | Published: March 19, 2016 12:32 AM2016-03-19T00:32:23+5:302016-03-19T00:32:23+5:30
देऊळगावराजा येथील घटना.
देऊळगावराजा (जि. बुलडाणा): शहरापासून ४ किमी अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ मार्च रोजी रात्री घडली. या घटनेकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पावसाने जंगलातील पाण्याचा साठा संपला असून, असंख्य जनावरे रात्री-बे रात्री पाण्याकडे धाव घेतात. त्यामुळे अनेकदा पाणी शोधण्यासाठी जनावरे मुख्य रस्त्यावर येतात. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच घटना १६ मार्च रोजी मध्यरात्री देऊळगावराजा ते सिंदखेडराजा रस्त्यावर एका हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला, असे प्राणी रस्त्यावर येतात आणि अज्ञात वाहनाचा शिकार होतात. या घटनेची माहिती स्थानिक वन विभागालाच नाही, वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अश्या घटना घडत असतात. तरीही त्याची दखल कोणीच घेत नाही. मृत अवस्थेत पडलेले हरण नंतर गेले कुठे, याची माहिती कोणालाच नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.