जुगार अड्ड्यावर धाड, पाच जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:27+5:302021-04-05T04:30:27+5:30

जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाकडून अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक ...

Gambling raid, crime against five people | जुगार अड्ड्यावर धाड, पाच जणांवर गुन्हे

जुगार अड्ड्यावर धाड, पाच जणांवर गुन्हे

Next

जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाकडून अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत व बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीते यांचे आदेशाने ३ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन मलकापूर शहर हद्दीमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तीन जुगार अड्ड्यांवर धाड टाकून कारवाई केली. याप्रकरणी आरोपी चंद्रकांत दिनकर उज्जैनकर (३०, रा. शास्त्रीनगर मलकापूर तालुका मलकापुर), मोहन अमरचंद निकम (४५, रा. वाकोडी, ता.मलकापुर), गोपाल काशिनाथ केने (३५, रा. किन्ही, ता. मलकापुर), अनिल भारूका (रा. मलकापूर), मुकेश पंडित (रा. शास्त्रीनगर मलकापूर) यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये एकूण २४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई पथकामध्ये पीएसआय नीलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, श्रीकृष्ण चांदूरकर, पोलीस हेड काँस्टेबल विलास काकड, गजानन आहेर, दीपक पवार, दीपक वायाळ, सुभाष वाघमारे, चालक संजय मिसाळ यांचा समावेश आहे.

Web Title: Gambling raid, crime against five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.