स्पोर्टिंग क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा

By admin | Published: August 26, 2015 11:48 PM2015-08-26T23:48:18+5:302015-08-26T23:48:18+5:30

खामगाव येथे दिलीपकुमार सानंदांनी दिले उपविभागीय अधिका-यांना निवेदन.

The gambling stand in the name of Sporting Club | स्पोर्टिंग क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा

स्पोर्टिंग क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा

Next

खामगाव : स्पोर्टींग क्लबच्या नावाखाली जुगाराचा व्यवसाय चालत असल्यामुळे खामगाव मतदार संघात कोणत्याही स् पोर्टींग क्लबला परवानगी देण्यात येवू नये अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी बुधवारी एका निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत निवेदन २६ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार आकाश लिंगाडे यांची भेट घेवून त्यांना सादर केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष टाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख, कृउबासचे संचालक तथा जि.प. सदस्य श्रीकृष्ण धोटे, सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विश्‍वपालसिंह जाधव, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्‍वर सुळोकार, माजी पं.स. सदस्य संजय तायडे, राजेश जोशी, गजानन सोनोने, शांताराम करांगळे, नदीमभाई, प्रमोद महाजन उपस्थित होते. या निवेदनात स्पोर्टींग क्लबच्या नावाखाली जुगाराचा व्यवसाय होत असतो. व या स्पोर्टींग क्लबच्या माध्यमातून अनेक शेतकरी, तरुण युवक लालसेपोटी जुगार खेळून त्यांचे संसार उद्ध्वस्त होत असतात असल्याचे नमूद करुन स्पोर्टींग क्लबच्या नावाखाली नांदुरा व जवळा पळसखेड येथे पोलिसांनी छापे मारुन लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. म्हणून संबंधित स्पोर्टींग क्लबचे परवाने जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी रद्द केले आहेत. स्पोर्टींग क्लबच्या माध्यमातून जुगाराचा अड्डा चालविणे, तेथे दारु पिणे व पैसे हारजीतवरुन वाद निर्माण होवून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खामगाव शहर हे संवेदनशील शहर असून राजकीय दबावाखाली उक्त स्पोर्टींंग क्लबला परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरात स्पोर्टींग क्लबला परवानगी दिल्यास शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी जनहितार्थ तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Web Title: The gambling stand in the name of Sporting Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.