तिकिटांच्या अनिश्चिततेचा खेळ
By Admin | Published: September 5, 2014 12:09 AM2014-09-05T00:09:59+5:302014-09-05T00:09:59+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील नेत्यांची घालमेल,कार्यकर्त्यांंच्या लागल्यात शर्यती
बुलडाणा: काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या बुलडाणा, मलकापूर व जळगाव जामोद या तिन मतदार संघामध्ये सद्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या तिनही मतदार संघातील इच्छुकांच्या मुंबई दिल्ली वार्या सुरूच असून आता विविध जातीधर्माचे शिष्टमंडळ नेत्यांच्या सर्मथनासाठी पाठविले जात आहे. बुलडाणा मतदार संघातील पहिले आमदार इंदुताई कोटंबकर यांच्यापासून तर धृपतराव सावळे यांच्यापर्यंंंंत विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याची परंपरासुध्दा आहे. त्यामुळे या मतदार संघात काहीही होवू शकते. हे काँग्रेसवासियांची धारणा असल्याने तिकीटाचा खेळ रंगला आहे. मलकापूरमध्ये जातीय समिकरणे लक्षात घेवून तिकीट निश्चित केले जाईल. त्यामुळे बुलडाण्याचा उमेदवार कोण? यावरही मलकापूरचे तिकीट कोणाला? याच्या चर्चा रंगत आहेत. जळगाव जामोदमध्ये तिकीटासाठी इच्छुक असणार्रे उमेदवार हे जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशांनीही येथे उमेदवारी मागितल्यामुळे या मतदार संघात कुठला चमत्कार होईल, हे सांगता येत नाही. सद्यामात्र प्रत्येक उमेदवाराला आपलेच तिकीट कन्फर्म असल्याचा आत्मविश्वास दिसून येतो व त्यामुळेच अशा उमेदवारांचे कार्यकर्ते सद्या शर्यती लावत तिकीटाचा खेळ अधिक रंगतदार करत आहेत.
लोकसभा निवडणुकांमध्ये दणदणीत यश मिळवून महायुती फार्मात आली असली तरी चिखली, सिंदखेडराजा व खामगाव या तिन मतदार संघा त उमेदवारी कुणाला याचा पेच निर्माण झाला आहे. खामगाव मतदार संघात आ.दिलीपकुमार सानंदा यांना आव्हान देण्यासाठी उमेदवार कोण? हे अजूनही स्पष्ट होत नाही. आ.भाऊसाहेब की अँड.आकाश फुंडकर हा संभ्रम कायम असल्याने येथील भाजपा कार्यकर्त्यांंनाही अनिश्चिततेच्या वा तावरणाला सामोर जावे लागत आहे. सिंदखेडराजा मतदार संघात सतत ५ वेळा शिवसेना पराभूत झाली. त्यामुळे आता मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी उमेदवार कोण? याची उत्सुकता जिल्हाभरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांंंंमध्ये आहे. चिखली या भाजपाच्या बालेकिल्ल्यात आ.राहुल बोंद्रे यांनी गेल्यावेळी काँग्रेसचा झेंडा फडकविला. त्यामुळे आता भाजपाकडून या मतदार संघावर जोरदार दावा केला जात आहे. भाजपाकडे उमेदवारांची प्रचंड मोठी यादी वेटींगवर असून हे सर्वच इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शे तकरी संघटनेने थेट उमेदवारी जाहीर करून भाजपा नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. या मतदार संघात स्वाभिमानीला की भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मेहकर व सिंदखेडराजा हे दोन मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहेत. यापैकी सिंदखेडराजा म तदार संघात आ.डॉ.राजेंद्र शिंगणे हे पाचव्यांदा रिंगणात राहणार आहेत. त्यामुळे येथे त्यांची दावेदारी प्रबळ असली तरी जुने जाणते नेते माजी आमदार तोताराम कायंदे यांनीही जनसंपर्क सुरू केला आहे. तर दुसरीकडे मेहकर या राखीव मतदार संघात राष्ट्रवादीला पराभव चाखावा लागत आला आहे. त्यामुळे या मतदार संघात आता राष्ट्रवादी कुणाचा प्रयोग करणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. या दोन मतदार संघाव्यतिरिक्त राष्ट्रवादीला जागा वाट पामध्ये आणखी किमान एक मतदार संघ हवा आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षङ्म्रेष्ठींकडे आग्रह धरून आहेत. पक्षाच्या जागावाटपात राष्ट्रवादीला मतदारसंघ वाढवून दिल्यापेक्षा जागांची अदलाबदल करा असा पवित्रा काँग्रेसने घेतला असुन मेहकर मतदारसंघ काँग्रेसला व जळगावजामोद राष्ट्रवादीला असा एक पर्याय काही नेत्यांनी समोर केला आहे. या पक्षांसह भारिप बमसं खामगाव आणि जळगावसाठी पुर्ण ताकदीने तयारी करत आहे. तर उर्वरीत ठिकाणी प्रबळ दावेदारांचा शोध सुरू आहे. बसपा, सपा यांच्यासोबतच अपक्ष उमेदवारांनीही चाचपणी सुरू केल्याने उमेदवारीची अनिश्चितता कार्यकर्त्यांसह नेत्यांचीही घालमेल वाढवणारी ठरत आहे.