संघ भावना निर्माण होण्यासाठी खेळ महत्त्वाचे
By admin | Published: December 25, 2014 01:46 AM2014-12-25T01:46:01+5:302014-12-25T01:46:01+5:30
बुलडाणा जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ : आयुक्त राजुरकर यांची उपस्थिती.
बुलडाणा : मानसिक ताणतणाव कमी करण्यासोबतच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य तसेच आत्मविश्वास वृद्धींगत करण्यासोबतच दैनंदिन कामकाज करताना एकोपा व एकसंघ भावना निर्माण होण्यास खेळांमधून मदत होते, त्याचा लाभ घेऊन विभागीय स्तरावर होणार्या स्पर्धेमध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल राहील, यासाठी सर्व खेळाडुंनी प्रयत्न करण्याची गरज अमरावतीचे विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी व्यक्त केली.
आज जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानावर जिल्हा परिषदेच्या वतीने तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे उपस्थित होत्या, तसेच बुलडाणा नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर पाटील, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रल्हाद ताठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, अनूप शेंगुलवार, सभापती गणेश बस्सी, अनिल इंगळे, शरदचंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश तोमर, सभापती वाघमारे, चित्रांगण खंडारे, माजी सभापती सुरेश वनारे, माजी अध्यक्ष भास्करराव ठाकरे, कृषी सभापती सुलोचना पाटील, सभापती अंकुशराव वाघ उपस्थित होते.