Ganesh Festival: सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान गणेश मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:55 PM2018-09-15T13:55:13+5:302018-09-15T13:56:02+5:30

Ganesh Festival: The Veer Hanuman Ganesh Mandal | Ganesh Festival: सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान गणेश मंडळ

Ganesh Festival: सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान गणेश मंडळ

googlenewsNext

सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे वीर हनुमान मंडळ

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:   येथील शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाचा सर्व धर्म समभाव जोपासना करणारे मंडळ म्हणून नावलौकीक आहे. या भागात मिश्र वस्तीचा समावेश असल्यामुळे कार्यकारिणीतही सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना स्थान दिले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर या मंडळाचा अधिक भर असला तरी, परिसरातील गोर गरीबांच्या सेवेसाठी मंडळाचे पदाधिकारी सदैव अग्रेसर असतात. नवनवीन संकल्पनांमुळे या मंडळाला शासनाकडून वारंवार गौरविण्यात आले आहे.

वीर हनुमान गणेश मंडळाची स्थापना सन १९८५ च्या कालावधीत झाली असून, सन १९९२ साली वीर हनुमान मंडळाची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली.  परिसरातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन बांधवांचा समावेश या मंडळाच्या कार्यकारिणत केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या समुदायातील व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाते.

महिला सशक्तीकरण, शेतकरी  आत्महत्या, पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक समस्यांवर या मंडळाकडून वेळोवेळी कृतीशील उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी मंडळाने गणेशोत्सव कार्यकारिणी अध्यक्षपदी प्रमोद सुरेश रोकडे(जैन) यांची निवड केली आहे. तर उपाध्यक्ष समाधान लोढे, सचिव शेख इरफान शेख युसुफ,  सहसचिव  संतोष डवंगे, कोषाध्यक्ष प्रल्हाद संपत बोदडे, श्याम कोथळकर, जसवंतसिंह शीख अशी सर्व धर्म समभावाची कार्यकारीणी तयार केली आहे. पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेशावर या मंडळाचा अधिकभर राहतो. त्यामुळे विविध सामाजिक संघटनांसोबतच पोलिस आणि महाराष्ट्र शासनाकडूनही मंडळाला वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांना हारार्पण केल्याशिवाय या मंडळाकडून श्री गणेशाची स्थापनाच केली जात नाही. हे या मंडळाचे वेगळे वैशिष्टे म्हणावे लागेल.

लोककलांची जोपासना!

सामाजिक एकोप्यासोबतच लोककलांची जोपासना करण्यासाठी वीर हनुमान मंडळाचे पदाधिकारी नियमित प्रयत्नशील असतात. रूग्णसेवेतही हे मंडळ सदैव अग्रेसर राहते. व्यसनमुक्ती, आरोग्य विषयक जनजागृती आणि एडस् जनजागृती विषयक कार्यक्रमामध्ये मंडळाचा नेहमीच पुढाकार राहतो. 


समाजातील उपेक्षीत आणि वंचितांची सेवा करण्यासोबतच राष्ट्र धर्माचे पालन वीर हनुमान मंडळाकडून केले जाते.   सर्व धर्म समभावाची जोपासना हे वीर हनुमान मंडळाचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.

- अ‍ॅड. मनदिपसिंह शीख, मार्गदर्शक, वीर हनुमान मंडळ, शंकर नगर खामगाव. /> 

Web Title: Ganesh Festival: The Veer Hanuman Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.