गणेशमूर्ती निर्मितीचे आगार चिखली!

By admin | Published: August 26, 2015 11:40 PM2015-08-26T23:40:26+5:302015-08-26T23:40:26+5:30

दरात वाढ झाली नसल्याने मूर्तीकारांना सोसावी लागणार वाढत्या महागाईची झळ.

Ganesh idol of creation! | गणेशमूर्ती निर्मितीचे आगार चिखली!

गणेशमूर्ती निर्मितीचे आगार चिखली!

Next

सुधीर चेके पाटील/ चिखली : पुढच्या वर्षी लवकर या, अशी गळ घालून लाडक्या गणरायाला निरोप देणार्‍या गणेशभक्तांना यावर्षी अधिक मासामुळे एक महिना जास्त वाट पाहावी लागली असली तरी येत्या १७ सप्टेंबर रोजी देशभरात गणपती बाप्पाचे मोठय़ा उत्साहात आगमन होणार आहे. यानुषंगाने गणेश मंडळांनी तयारी चालविली आहे. तर दुसरीकडे गणेश मूर्ती बनविण्यात मूर्तिकार व्यस्त झाले आहेत. सलग तीन वष्रे दुष्काळ आणि यावर्षी पावसाने दिलेली हुलकावणी व वाढत्या महागाईच्या विपरीत परिणामाला मूर्तीकारांना सामोरे जावे लागत असून, मूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या साहित्यांच्या दरात १0 टक्के वाढ होऊनदेखील मूर्तींंच्या किमती स्थिर ठेवल्याशिवाय पर्याय नसल्याने मू र्तीकारांना फटका बसणार आहे. येथील बैलजोडी परिसरातील शिव नगरस्थित गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. पेंढारकर कुटुंबियांद्वारे चालविले जाणार्‍या या कारखान्यातील गणेश मूर्तींंना बुलडाणा जिल्हय़ासह शेजारील जालना, औरंगाबाद व अकोला जिल्हय़ात दरवर्षी मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी गणेश चतुर्थी जसजशी जवळ येते, तसतसे गणेश मू िर्तकार आपली सर्व कला पणाला लावून गणेशमूर्ती साकारत आहेत. येत्या १७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला देशभरात संकटमोचन, विघ्नहर्ता गणपती बाप्पाची ढोल - ताश्याच्या गजरात स्थापना केली जाणार आहे. तत्पूर्वी गणेशमूर्तींंचे काम पूर्ण करण्यासाठी येथील मूर्ती कारखान्यातील मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये नवनवे ट्रेंड येत असतात, त्यानुसार गणेश मंडळांना सर्वात आकर्षक व सर्वांंगसुंदर गणेश मूर्ती हवी असते. त्यांच्या मागणीनुसार गणेशाचे नवनवे रूप बनविण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत. त्यातच गणेश स्थापनेला अवघ्या २0 दिवसांचा कालावधी असल्याने मू र्तीकारांचे कुटुंबीयदेखील दिवसरात्र एक करून मूर्तींंवर अखेरचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत.

Web Title: Ganesh idol of creation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.