गणेशोत्सवात मोठ्या मुर्तींना बंदी; जिल्ह्यात काथ्याची मागणी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 01:08 PM2020-07-25T13:08:07+5:302020-07-25T13:10:12+5:30
जेथे एका मुर्तीकाराकडे ३०० काथ्याचे बंडल लागत होते तेथे सध्या अवघे एखाद दुसरे बंडल सध्या लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गणेशोत्सवात मोठ्या मुर्त्यांना यंदा बंदी घालण्यात आल्यामुळे या मुर्त्यांच्या मजबुतीसाठी वापरण्यात येणाऱ्या नारळाच्या काथ्यांचीही मागणी जिल्ह्यात घटली आहे. जेथे एका मुर्तीकाराकडे ३०० काथ्याचे बंडल लागत होते तेथे सध्या अवघे एखाद दुसरे बंडल सध्या लागत आहे. त्यातच काथ्यांचा भावही यंदा वधारलेला असल्याने मुर्तीकारांसमोर समस्या निर्माण झाली आहे.
बुलडाण्यात पूर्वी जेथे ८०० रुपयांच्या आसपास एक बंडल मिळत होते तेथे सध्या १२०० रुपयांचा भाव या बंडलाचा झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सव येथी गणेश मुर्ती जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मध्यप्रदेश, गुजरात, औरंगाबादसह पुणे जिल्ह्यातही येथील मुर्त्या जात असल्याने सण उत्सव काळात एका मुर्तीकाराकचे नारळाच्या काथ्याच्या जेथे चार ट्रक भरून येत होत्या तेथे आता मोजकेच नग लागत आहे. पिओपीच्या मुर्त्यांमध्ये प्रामुख्याने या काथ्यांचा मुर्तीच्या मजबुतीसाठी वापर केल्या जातो. मात्र यंदा मुर्तीच्या उंचीचे बंधन असल्याने मुर्तीकारांनी छोट्या मुर्त्या बनविण्यास प्राधान्य दिले असले तरी या मुत्यांना मागणी नाही. तसेच मर्यादीत स्वरुपातच घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांनी मुर्त्यांची नोंदणी केली आहे. त्यामुळे सव या छोट्याच्या गावात मुद्रा लोण घेवून गणेश मुर्ती बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्यांकडे यंदा कामगारांचीही संख्या कमी आहे. व्यापारी वर्गानेही अद्याप मुर्त्या घेण्यासाठी मुर्तीकारांचा कारखाना गाठलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट गणेशोत्वासह या उत्सवाशी निगडीत असलेल्या मुर्तीकारांवरही कोसळले असून आर्थिक व्याप्ती त्यामुळे या व्यवसायातील यंदा घटल्याचे चित्र आहे.
एकट्या सव गावातील हे चित्र नसून बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असे व्यवसाय करणाºयांवर याचा विपरीत परिणाम झालेला आहे.
दुर्गा देवी, लक्ष्मीच्या मुर्तींचेही काम संथगतीने
आगामी काळातील सण उत्सव पाहता दसºया दरम्यानचा दुर्गा देवी उत्सव व दीपोतस्वातील लक्ष्मीच्या मुर्त्या बनविण्यासही अद्याप मुर्तीकारांनी प्रारंभ केलेला नाही. कोरोना संसर्गाचा विपरीत परिणाम हा ग्रामस्तरावही यातून जाणत आहे. त्यामुळे दुर्गादेवी, लक्ष्मीच्या मुर्ती बनवाव्यात कि नाही असा प्रश्न मुर्तीकारांसमोर उभा ठाकला आहे.