शांतता समितीने घेतली गणेश मंडळे दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:36 AM2017-08-28T00:36:59+5:302017-08-28T00:36:59+5:30
डोणगाव: डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २८ गणपती बसले असून, ५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ मांडण्यात आले आहेत. तर डोणगावमध्ये १४ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव: डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २८ गणपती बसले असून, ५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ मांडण्यात आले आहेत. तर डोणगावमध्ये १४ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
नुकतीच डोणगाव शांतता समितीची बैठक संपन्न झाली व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी म्हणून वेगवेगळे उपक्रमावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गणेश मंडळांना प्रोत्साहन व सहकार्य मिळून शांतता प्रस्थापित होण्यासाठी ठाणेदार आकाश शिंदे व पीएसआय विलास मुंढे यांनी डोणगाव गणेश मंडळ दत्तक योजना ही संकल्पना गणेशमंडळ व शांतता समिती यांच्यासमोर ठेवली. यामध्ये प्रत्येक गणेश मंडळ अध्यक्ष व शांतता समिती सदस्यांसह एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड यांना एक गणेश मंडळ दत्तक देण्यात आले. ज्या गणेश मंडळाला जो शांतता समिती सदस्य दत्तक घेईल त्यांच्याकडे सर्व त्या गणेश मंडळाला भेट देणे व मार्गदर्शन करणे व शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य देण्यात आले. जे गणेश मंडळ दहाही दिवस राष्ट्रीय हिताचे व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून वेगवेगळे संदेश जनतेपर्यंत पोहचवेल व शांतता प्रस्तापित करून विसर्जन करेल अशा सर्व गणेश मंडळ अध्यक्ष व शांतता समिती सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर योजना जिल्हय़ात प्रथमच डोणगाव पोलीस स्टेशनने सुरू केल्याने गणेश मंडळाचे वेगवेगळे उपक्रम पाहावयास मिळत आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी डोणगावचे ठाणेदार प्रत्येक गणेश मंडळाला शांतता समितीच्या सदस्यांसह भेट देत असल्याने या आगळ्यावेगळ्या डोणगाव गणेश मंडळ दत्तक योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.