गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

By अनिल गवई | Published: September 7, 2022 12:12 PM2022-09-07T12:12:45+5:302022-09-07T12:12:55+5:30

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर संवेदनशील शहर असलेल्या खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपरोक्त निर्णय घेण्यात आला.

Ganesh Visarjan Procession arrangements are on the authorities in khamgaon buldhana | गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

Next

खामगाव - खामगाव येथील श्री गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्तादरम्यान खामगाव येथील तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक आणि मुंबईचे पोलीस उपआयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर संवेदनशील शहर असलेल्या खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपरोक्त निर्णय घेण्यात आला.

पोळा मिरवणूक दगडफेक प्रकरणी एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला. पोलिसांनी निरपराधांवर कारवाईच्या निषेधार्थ बंदचे आवाहनही करण्यात आले. हा बंद यशस्वी झाल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या शांतता समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यासह तब्बल ७२ जणांविरोधात विना परवानगी रॅली काढल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाता कामा नये, यासाठी पोलीस महासंचालकांनी हेमराजसिंह राजपूत आणि प्रदीप पाटील या दोन अधिकाऱ्यांची बंदोबस्तासाठी विशेष नेमणूक केली आहे. गुरूवार ८ ते शनिवार १० सप्टेंबर या कालावधीसाठी  त्यांची  नेमणूक खामगाव येथे करण्यात आली आहे. त्याचवेळी जळगाव जामोदचे पोलीस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्याकडे मिरवणुकीची सर्वस्वी जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.

पोलीस प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांशी आपले वैर नाही. पोळा मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या आकसपूर्ण कारवाईमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भविष्यात पोलीस विरुद्ध गणेशमंडळ असा वाद उद्भवू नये. यासाठीच पोलीस प्रशासनाची ही भूमिका असावी.
- अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार, खामगाव विधानसभा मतदार संघ.

Web Title: Ganesh Visarjan Procession arrangements are on the authorities in khamgaon buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.