सवडद येथे १३ फेब्रुवारीपासून गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:11+5:302021-02-06T05:05:11+5:30
साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या सवडद येथे श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशाेत्सवानिमित्त १३ फेब्रुवारीपासनू विविध ...
साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या सवडद येथे श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशाेत्सवानिमित्त १३ फेब्रुवारीपासनू विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.
सवडद येथे श्री सिद्धिविनायक मंदिरावर तीन दिवसीय गणेश जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. फिजिकल डिस्टसिंगचे पालन करून १३ फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी ९ ते १२ पर्यंत डॉ. ज्ञानेश्वर तांगडे हे मोफत बालरोग तपासणी तथा मोफत औषधोपचार करणार आहेत. सायंकाळी ८ ते १० वा गणेश घुले (औरंगाबाद) यांचा विद्यार्थ्यांना ऊर्जा देणारा "सुंदर माझी शाळा" जागर बालकवितेचा हा कार्यक्रम होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते १० राष्ट्रीय कीर्तनकार सप्त खंजेरीवादक संदीपपाल महाराज यांचा कार्यक्रम तर १५ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बालकीर्तनकार सोहम महाराज काकडे यांचे काल्याचे कीर्तन हाेणार आहे. त्यानंतर किशोर महाजन, ओमप्रकाश अग्रवाल, डॉ. शेषराव देशमुख यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ ते १० गुरूदेव सेवा मंडळ वझर खामगाव यांच्या कार्यक्रमाने सांगता होईल. तिन्ही दिवस सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत अशोक महाराज घायाळ यांच्या अमृतवाणीतून गणेश पुराण कथासार संपन्न होणार आहे. यामध्ये हरिपाठ, भजन असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.